Breaking News

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली ‘त्या’ निर्णयाच्या चौकशीची मागणी दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

या पॅकेजसाठी एक रुपयाही न घेता हे पॅकेज मोफत द्यावे आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे अशी मागणी दानवे यांनी केली.

४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील गोरगरीब जनतेला रेशन दुकानांच्या माध्यमातून दिवाळी फूड किट देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त फूड किट ( चना डाळ, रवा, साखर व पामतेल) पुरवठा करणे या योजनेसाठी NCDEX Emarkets limited च्या वतीने दिनांक १ ऑक्टोबर २०२२ ला परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले. ३ ऑक्टोबर

२०२२ पासून निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्यापूर्वी ५१३ कोटी २४ लाख रुपयांच्या निविदा प्रक्रियेसाठी अत्यंत घाई-गडबडीने व कमी वेळात निविदा प्रक्रिया का पार पाडण्यात आली , कुणाच्या फायद्यासाठी हे केले जात आहे? असे प्रश्न ही दानवे यांनी या पत्रात उपस्थित केले आहेत. एकप्रकारे एखाद्या एजन्सीच्या फायद्यासाठी खुली स्पर्धा न घेता अवघ्या ३ दिवसांत मंत्रिमंडळ निर्णय होण्यापूर्वी ही निविदा काढण्यात आली असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *