Breaking News

बीकेसीत शिंदेंच्या समर्थनार्थ ठाकरे कुटुंबिय, जयदेव ठाकरे म्हणाले, एकटे सोडू नका एकनाथ शिंदे याचे चार-पाच निर्णय आपल्याला आवडले

खरी शिवसेना कोणाची यावरून अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. त्याचा निकाल निवडणूक आयोगाच्या आधी आज ५ सप्टेंबर रोजी शिवसेना विरुद्ध शिंदे गटाने केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जनतेच्या दरबारात लागेल. शिंदे गटाने बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली. त्यातच आता या मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे थोरले सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्याचबरोबर स्मिता ठाकरे, स्मिता ठाकरे यांचे चिरंजीव यांनीही बीकेसी मैदानावर आवर्जून हजेरी लावली.

मागील काही दिवसांपासून जयदेव ठाकरेही शिंदे गटात दाखल होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावरही जयदेव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलताना जयदेव ठाकरे म्हणाले, बीकेसी मैदानावर आलो आहे. ठाकरे कधी लिखीत घेऊन येत नाहीत. हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथ शिंदेंनी दोन चार भूमिका घेतलेल्या मला आवडल्या. त्यांच्यासारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवा आहे.

चिपळ्या वाजवणारा एकनाथांना जवळच्यांनी संपवलं. तसेच, ‘एकनाथला एकटानाथ’ होऊन देऊ नका, ही तुम्हाला विनंती आहे. एकनाथ शिंदे गोरगरीब आणि शेतकऱ्यांची कामे करत आहेत. शेतकरी राबतो म्हणून दोन दाने आपल्या पोटात जातात. एकनाथ शिंदे हे राबकरी, कष्टकरी आणि मेहनत करणारे असून, त्यांना दुरावा देऊन नका. राज्यातील विधानसभा बरखास्त करा, परत निवडणूक घ्या आणि शिंदेराज्य येऊद्या, अशी मागणी जयदेव ठाकरे यांनी केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *