Breaking News

रिपाई नेते जोगेंद्र कवाडे यांची घोषणा, काँग्रेस सोबतची आघाडी संपुष्टात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्यात प्रा. कवाडे यांची घोषणा

गेल्या दिड दशकापासून काँग्रेस आघाडी मध्ये मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने सम्मानपूर्वक सत्तेत वाटा देत आपले राजकीय मित्रत्व जपून आघाडीचा धर्म पाळणे आवश्यक होते. परंतु तसे न करता पीपल्स रिपब्लिकन पक्षाची सातत्याने उपेक्षा करून जो विश्वासघात केले आहे. अशा काँग्रेसपक्षासोबत असलेली आघाडी संपुष्टात आणत असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.

तसेच यापुढे विश्वासघात करणाऱ्या पक्षासोबत निवडणूक विषयक आघाडी न करता पक्षाद्वारे आगामी काळातील सर्व निवडणूका या स्वबळावर लढविल्या जाणार असल्याचे सांगतानाच इतर कुठल्या राजकीय पक्षाकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आघाडीचा विचार देखील केल्या जाईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी केली. नागपूर येथे पक्षाव्दारा आयोजित -सांस्कृतिक दहशतवाद बिमोड भीमसैनिक मेळाव्या मध्ये बोलतांना स्पष्ट केली.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला लाँगमार्च प्रणेता, माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत मेळाव्याला संबोधित करतांना पक्षाध्यक्ष प्रा. जोगेन्द्र कवाडे सर पुढे म्हणाले की, देशभरात विघटनवादी प्रवृत्तीचा धूमाकुळ चालु आहे. त्यांच्या धार्मिक व जातीय धोक्यात येवून राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेला बाधा पोहचत आहे. केंद्र सरकार हे, देखील संविधानिक नाही तर आर. एस. एस. चा अजेंडा राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले संविधान बदलवू पाहत आहे. सांस्कृतिक दहशतवादाच्या माध्यमातून दहशतवा पसरवून दलित, मागासवर्गीय, आदीवासी, अल्पसंख्याक समुदायांना लक्ष करून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहे. लोकशाहीला संपुष्टात आणून हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि म्हणूनच देशात फोफावत चाललेल्या सांस्कृतिक दहशतवादाचा बिमोड करण्याचा संकल्प करून संविधान वाचविण्यासाठी भीमसैनिक आपल्या प्राणाचे मोल देण्याची तयारी ठेवली आहे. संविधानाचे रक्षण करतील याची जाणिव घटना बदलवू पाहणाऱ्यांना धूमधा’ ठेवावी असे त्यांनी ठणकावून सांगितले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवानेते जयदीप कवाडे यांनी निमंत्रित केलेल्या ‘सांस्कृतिक दहशतवाद बिमोड भीमसैनिक मेळाव्याचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपावराव आटोटे यांचे हस्ते करण्यात आले आहे. या भव्य मेळाव्यात प्रामुख्याने प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी – सामाजिक -आर्थिक – मुद्यांवरही आपले विचार व्यक्त करतांना म्हंटले की, यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती असलेले ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे. सामाजिक अन्याय केला त्या संबधाने बोलतांना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जे निर्णय घेतले होते तेच निर्णय आताच्या विद्यमान शिंदे + फडणवीस सरकारने रद्द करण्याऐवजी त्याचीच अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच मागासवर्गीयाच्या पदोन्नतीतील आरक्षण हटविण्याचा निर्णय घेतला गेला होता. तो निर्णय देखील रद्द करून पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण पूर्ववतच करावे ,अशी मागणीही करत विद्यमान सरकार या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे, याच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.

प्रामुख्याने भीमसैनिक मेव्याचे निमित्ताने पक्षाच्या वतीने ११ ठराव पारीत करण्यात आले १) वाढल्या अत्याचारास प्रतिबंध घालणे आणी अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अमंलबजावणी, बेरोजगारीची समस्या दुर करणे, मागासवर्गीय कर्मचान्याचे नोकरीतील ३३ आरक्षण पूर्ववत चालू करणे शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करणे, खाजगीकरणाचे कारस्थान थांबविणे. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करणे, महागाई नियंत्रीत करणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याना सरसकट आर्थीक मदत करणे. आगामी निवडणुका घ्या खबभवर उढविणे. संविधानाचे रक्षणार्थ तथा सांस्कृतीक बिमोड करण्या साठी- कोल्हापूर ते चैत्यभूमी आणि शेवटचा ठराव, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व कार्याध्यक्ष घोषित करणे.

भीमसैनिकाच्या राष्ट्रीय मेनव्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्षपदी पुढील वर्षा करीता माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे सर या फेर निवड करण्यात येत असल्याचे घोषीत करण्यात आले तर राष्ट्रीय कार्याध्य युवानेते भाई जयदीप कवाड यांची फेर निवड करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले तेव्हा या निवडीचे उपस्थित भीमसैनिकांनी टाळ्याच्या आवाजात – प्रा. जोगेन्द्र कवाडे सर आगे बढो हम तुम्हारे साथ हैं। युवानेते जयदीप भाई आगे बढो च्या जोरदार घोषणा देवून स्वागत केले.

यावेळी मंचावर युवा नेता जयदीप कवाडे, जे. के. नारायण, गणेशभाई उन्हवण, चरणदास इंगोले, बापुसाहेब गजभारे, प्रमोद टाले. विजय वाघमारे, छत्रपालसिंह (हरियाणा), राजकिशोर आनंद (नवी दिल्ली), रशभाई सोनवणे (गुजरात), इंद्रजित घाटे, भगवान आढाव, प्रा, पुरुषोत्तम पाटील, अनिल तूरुकमारे, नरेंद डोंगरे, दिलीप भिसे, दौलत हिवराळे, युवराज कामळे, मेघराज डोंगरे, राजेश जाधव, भगवान कामळे, महिला आघाडीच्या सुवर्णा वानखेडे, सविताताई नारनवरे, मिनाबाई अविंग, संजय खांडेकर, प्रा. मुनेश्वर बोरकर, अरुण वाहने, सुमेध मुरपाठकर च्यासह विविध राज्यातून आलेले नेते उपस्थित होते.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *