Breaking News

अंबादास दानवे यांची टीका; रबर स्टँप मुख्यमंत्री… असंवेदनशील सत्ताधाऱ्यामुळे शेतकऱ्याना आत्महत्या करावी लागतेय

एकीकडे रबर स्टॅप मुख्यमंत्री महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करु, असे आश्वासन देत आहेत, त्याच वेळी दिवसाला दररोज सरासरी ३ शेतकरी आत्महत्या करतायत. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे मागील दोन महिन्यात राज्यात सुमारे १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजून किती आत्महत्या झाल्यावर हे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्परता दाखवेल असा संतप्त सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

राज्यातील असंवेदनशील सत्ताधारी शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी गणेश मंडळांना भेटी देण्यात व्यस्त असल्यामुळे डोक्यावर वाढत असलेला कर्जाचा डोंगर व शेतात पीकच न उगवल्याने शेतकऱ्याना आत्महत्या करावी लागत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

एकीकडे शेतकरी कर्ज व पिकाअभावी आत्महत्या करतोय दुसरीकडे सत्ताधारी मात्र मुंबई ठाण्यातील गणेशमंडळांना भेटी देण्यात व्यस्त असून लाखोंच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज बीड जिल्ह्यातील समनापुर येथील आत्महत्यग्रस्त शेतकरी “नवनाथ शेळके” व रुईलिंबा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी “भागवत किसान पिसाळ” यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. यावेळी शेळके व पिसाळ यांचे आई, वडील आणि कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या.

शेळके यांच्या आईवडिलांना आपला तरुण मुलगा गमावल्याचे सांगताना अश्रू अनावर झाले. त्यावेळी तुमच्या दुःखात मी व शिवसेना पक्ष सोबत असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली. तसेच संबधित तहसीलदार यांच्याशी चर्चा करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याने एक लाख रुपयांच कर्ज घेतले होते, मात्र त्याचे व्याज हे पाच लाख रुपये झाले. त्यात शेतीला पाणी न मिळाल्याने शेतातील कापूस सोयाबीन जळून गेल. कर्जाचा डोंगर व पिकच न उगवल्याने तणावात असलेल्या शेळके यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली. भागवत पिसाळ यांनीही कर्जामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

राज्यातील सरकारने वेळीच मदत केली असती तर कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचा जीव वाचला असता अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कॉफी शॉपचीही केली पाहणी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराईत कॉफी शॉपची यावेळी पाहणी केली. तसेच या प्रकरणाच्या तपासाची माहिती दानवे यांनी घेतली. आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी दानवे यांनी केली.

यावेळी संपर्कप्रमुख धोंडु पाटील, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, विपुल पिंगळे, परमेश्वर सातपुते, नितीन धांडे, तहसिलदार हजारे, संगिता ताई चव्हाण, माजी मंत्री बदमराव पंडित, तालुकाप्रमुख गोरख शिंगन, रतन गुजर, उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप, बंडु भाऊ पिंगळे बप्पासाहेब घुगे, शहरप्रमुख सुनिल सुर्वशे उपस्थित होते.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *