Breaking News

अजित पवार म्हणाले, नव्या पिढीने तारत्मय बाळगायला हवे, टीकेला उत्तर आमचे नेते देतील फडणवीसांना टोला पण थेट बोलण्याचे टाळले

मराठी ई-बातम्या टीम

गोवा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष असून शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची खोचक टीका केल्यानंतर यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना याबाबत विचारले असता नव्या पिढीने बोलताना तारत्मय बाळगायला हवे असा शालूजोडा फडणवीस यांना लगावत फडणवीसांच्या टीकेला पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रफुल पटेल आणि देशाच्या राजकारणातील आमच्या भगिनी सुप्रिया सुळे उत्तर देतील असे सांगत फडणवीसांच्या टीकेवर फारसे बोलण्यास नकार दिला.

महाराष्ट्रापुरतं जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचं उत्तर सडेतोडपणे देईल. देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल असे सूचक उत्तरही त्यांनी यावेळी दिलेय

राजकीय जीवनात मला ३० वर्षे झाली. मला बारामतीकरांनी जरी खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण ६ महिन्यात मी परत आलो. शरद पवार यांना दिल्लीला जावे लागले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. मी महाराष्ट्रात समाधानी आहे. माझं माझं काम चाललेलं आहे. मात्र शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचं देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोललं पाहिजे, तारतम्य पाळलं पाहिजे असा खोचक टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

पुणे बँकेत एका विचाराचे लोक  

एखाद्या जागेचा अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली. सगळे एका विचाराचे लोक निवडून आले आहेत. आज आम्ही पुरंदर तालुक्यातून निवडून आलेल्या दिगंबर दुर्गाडे यांना चेअरमन म्हणून संधी दिली आहे. व्हाईस चेअरमन म्हणून पहिल्यांदा बँकेत निवडून आलेले सुनील चांदेरे यांची निवड केली.

चांदेरे हे मुळशी तालुक्यातील अ वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. दिगंबर दुर्गाडे ड वर्गाचं ओबीसी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सर्वांनी या दोघांना संधी देण्याचं काम एकमताने केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *