Breaking News

नवाब मलिक म्हणाले, भोजन मात्र दिखावा था…जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा फोटो ट्विट करत साधला युपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भोजपूरी अभिनेत्यावर निशाना

मराठी ई-बातम्या टीम

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजल्यानंतर उत्तर प्रदेश राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि भाजपाचे अनेक आमदार पक्षाला रामराम करून समाजवादी पार्टीत प्रवेश करत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दलित, मागासवर्गाच्या घरी पुन्हा एकदा चुचकारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यापार्श्वभूमीवर आज योगी आदित्यनाथ यांनी एका दलित कुटुंबाच्या घरी जेवण केले. यावेळी त्यांच्यासोबत भोजपुरी अभिनेता रवि किशनही होते. या दोघांच्या जेवण करतानाचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत त्यांचे ताट आणि जेवणाच्या पध्दतीवर निशाणा साधला आहे.

योगी यांचा फोटो ट्विट करत दलित के घर भोजन मात्र दिखावा था, सुना है रसोईया और भोजन का इंतजाम भी बीजेपी ने किया था असा उपरोधिक टोला त्यांनी योगींना लगावला. तर भोजपुरी अभिनेता रवि किशन याचा फोटो ट्विट करत पूरी और भाजी दर्शाता है की माल रसोईये का है, दलित लोटे मे पानी पिये और अभिनेता कागज की गिलास में, वाह बचवा वाह..जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा असे सांगत दलितांच्या घरी जेवण करण्याचा फक्त ड्रामा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

उत्तर प्रदेशमधील ज्या मंत्री आणि आमदारांनी भाजपाचा राजीनामा देत जी कारणे सांगितली त्यामध्ये दलित और पिछडोंका उत्पीडन असा शब्द प्रयोग करत भाजपावर टीकास्त्र सोडत समाजवादीत प्रवेश केला. नेमका त्याच टीकेचा आधार घेत योगी आदित्यनाथ यांनी दलित आणि मागासवर्गियांना आपले करण्याच्या उद्देशाने आणि त्यांची मते मिळविण्यासाठी दलितांच्या घरी जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील राजकिय पक्षांकडून करण्यात येत आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *