Breaking News

भाजपाची पहिली यादी जाहीर, योगी आदित्यनाथ मथुरेतून नाहीतर “या” मतदारसंघातून उभे परंपरागत गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार

मराठी ई-बातम्या टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजपामधील अनेक नेते आमदार पक्षाला रामराम करत समाजवादी पक्षाची वाट धरत आहे. त्यातच मध्यंतरी एका श्रीकृष्ण भक्ताला स्वप्नात येवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असे सांगितले त्यामुळे या भक्ताने थेट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहीत तशी विनंती केली. परंतु श्रीकृष्ण भक्ताच्या विनंतीला नकार देत योगी आदित्यनाथ यांनी आपल्या परंपरागत गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून पक्षाच्या वतीनेही त्यांना तेथून उमेदवारी जाहीर केली.

भाजपाने उत्तर प्रदेशातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीत पहिले नाव त्यांचेच गोरखपूर मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य प्रसाद यांना सिराथू येथून उमेदवारी देण्यात आलेली आहे.

विशेष म्हणजे गोरखपूर मतदारसंघासाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. तर केशव प्रसाद मौर्य यांच्या सिराथू मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या ५७ मतदारसंघातील तर दुसऱ्या टप्प्यातील ४८ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा आज भाजपाने केली आहे.

‌विशेष म्हणजे भाजपाकडून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागांवर महिला उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. यामध्ये कैराना येथून मृगांका सिंह, चरथावल येथून सपना कश्यप, मोदीनगर येथून मंजू शिवाच, खुर्जा येथून मीनाक्षी सिंह, आग्रा ग्रामीण मधून बेबी रानी मौर्या, बाहमधून राणी पक्षालिका, बिजनौर येथून सूची मौसम चौधरी, चाँदपूर येथून कमलेश सैनी, चन्दौसी गुलाबो देवी, मिलक मधून राजबाला यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपा आदी पक्षाकडून अद्याप आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र भाजपाने आपली पहिली यादी जाहीर करत इतर पक्षांपेक्षा सर्वात पुढे असल्याचे दाखवून दिल आहे. याशिवाय प्रचारातही आपणच सर्वात पुढे राहु असेही यापूर्वीही भाजपाने दाखवून दिले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या यांची उमेदवारी:-

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

भाजपाचे आता “गाव चलो अभियान”

भाजपातर्फे ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *