Breaking News

पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडसाठी पोटनिवडणूक जाहिर लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त जागांसाठी कार्यक्रम

पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मम जगताप यांचे दिर्घ आजाराने काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे या रिक्त झालेल्या दोन जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. तसेच ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या निवडणूकाही जाहिर केला.

दरम्यान पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड जागेसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर २ मार्चला मतमोजणी होवून निकाल जाहिर करण्यात येणार आहे.

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर २ मार्च रोजी या मतमोजणी होईल. ३१ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होणार आहे.

निवडणूक आयोगाने त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांसाठी देखील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार त्रिपुरा राज्यात येत्या १६ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी नागालँड आणि मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. या तिन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.

नागालँड आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये सोबतच निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ७ फेब्रवारी आहे. तर ८ फेब्रुवारीपर्यंत अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. या दोन राज्यांमध्ये येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल.

त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. उमेदवारांना ३० जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज करता येईल. ३१ जानवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. २ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. १६ फेब्रुवारी रोजी येथे मतदान होईल. तर २ मार्च रोजी मतमोजणीला केली जाईल.

Check Also

शरद पवार यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण…

सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. १० वर्षांत स्वतः काही केले नाही, आणि हिशेब आम्हाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *