Breaking News

Tag Archives: pimpari chinchwad

नवनगर विकास प्राधिकरणाद्वारे संपादित जमिनीच्या मोबदल्यात ६.२५ टक्के परतावा

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आपल्या स्थापनेपासून (१४ मार्च १९७३ ते ३१ डिसेंबर १९८३ या कालावधीत) ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्राधिकरणाकरिता संपादित केल्या होत्या, अशा संपादित जमिनींकरीता संबंधित जमीन मालकांना ६.२५ टक्के प्रमाणे जमीन परतावा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या (११ मार्च) बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड प्राधिकारण …

Read More »

पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान यांनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील या मेट्रो प्रकल्पांची दूरदृश्य …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, … ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहीर केला. हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले. यासंदर्भात सदस्या अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, चाकण हद्दवाढीचा आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा…

राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. या …

Read More »

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त चौबे म्हणतात, लाठीमार नाही किरकोळ झटापट

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आषाढ एकादशी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने आज रवाना होणार होती. मात्र तत्पूर्वीच आळंदी येथे पालखी प्रस्थानाच्या आधीच वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावरून काँग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीकेची झोड उठविली. त्यावरून अखेर पिंपरी-चिंचवडचे पोलिस …

Read More »

पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होऊ न देण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय पीएमपीएमएलचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांना आदेश

पुणे देशातील सर्वात जलदगतीने विकसीत होणारे शहर आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही याची पीएमपीएमएल प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पीएमपीएमएलच्या चार ठेकेदारांकडून काही दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी शहर बससेवेबाबत पुणे व पिंपरी …

Read More »

पिंपरी-चिंचवड उमेदवारीवरून अजित पवार म्हणाले, बोलणं झालं उध्दव ठाकरेंचा आघाडीला पाठिंबा ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांनी शांत रहावं यासाठी प्रयत्न

पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली. सुरुवातीला या जागेसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने माघार घेतली. मात्र ठाकरे गटाचे संभावित उमेदवार राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी …

Read More »

पुणे-पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीसाठी मविआचे उमेदवार उद्या जाहीर जयंत पाटील, नाना पटोले आणि सुभाष देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती

पुणे शहरातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून भाजपा- शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यावेळी पहायला मिळणार आहे. या दोन्ही जागेवर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच …

Read More »

पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडसाठी पोटनिवडणूक जाहिर लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त जागांसाठी कार्यक्रम

पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मम जगताप यांचे दिर्घ आजाराने काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे या रिक्त झालेल्या दोन जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. तसेच ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या निवडणूकाही जाहिर केला. …

Read More »

‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मागील २४ तासापेक्षा जास्त काळ सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारीतून वाहण्याबरोबरच पुण्याच्या रस्त्यावर आणि घराघरात पाणी शिरले. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे झाले. तर अनेक नागरीकांची वाहने पावसाच्या पाण्यात वाहून जाताना दिसत होते. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसत होते. या …

Read More »