Breaking News

कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्यासाठी भाजपचे कट कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी
कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपकडून कट कारस्थान सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
केंद्राच्या इंडस्ट्री मंत्रालय खात्याकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र दिले आहे. या पत्रात मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली ती जागा मिठागरांसाठी आहे. आणि आता कारशेडला दिलेली चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे असे पत्रात म्हटले आहे. याआधी मिठागराच्या बऱ्याचशा जागा राज्य सरकारला केंद्राने २००२ साली वर्ग केल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपचे लोक सुरुवातीला ही खाजगी जागा आहे सांगत होते आणि आता केंद्र सरकारच्या मालकीची आहे असे सांगत आहेत यावरुन भाजपच्या लोकांना मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा आहे असेही ते म्हणाले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *