Breaking News

जयंत पाटील यांची टीका, देशात अमृतकाळ साजरा आणि शेतकरी आत्महत्या करतोय राज्य आणि केंद्र सरकारला लगावला टोला

राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अधिकच वाढत चालल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. एकीकडे देश अमृतकाळ साजरा करतोय तर दुसरीकडे राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला लगावला आहे.

यासंदर्भात जयंत पाटील यांनी एक ट्विट केले असून यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात १ हजार ५८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या २५ वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिक लावणी केली. मात्र अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली. हाता तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या सरकारच्या काळात आपले जीवन संपवणे सोपे वाटले हेच सरकारचे अपयश आहे.

देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. ही धोक्याची घंटा सरकारने ओळखावी आणि शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी असे पाटील यांनी म्हटले आहे.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शरद पवार यांनी घेतला पटेल यांचा समाचार, मलाही उत्सुकता आहे पण ते ईडीचे…

कर्जत येथील अजित पवार गटाच्या मंथन शिबीरात बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *