Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांचे टीकास्त्र, पंतप्रधान मोदी INDIA ला ईस्ट इंडिया कंपनी म्हणतायत… मात्र मणिपूरप्रश्नी पंतप्रधान आजही संसदेत बोलायला तयार नाहीत

जवळपास अडीच महिन्यापासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात उफाळलेल्या हिंसाचार काही केल्या शमायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस मणिपूरमधील हिंसाचाराच्या नवनवीन घटनांचे व्हिडिओ आणि माहिती बाहेर येत आहे. त्यातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या दिवसापासून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मणिपूरप्रश्नी चर्चेची मागणी केली. मात्र काल गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चेची सुरुवात करावी असे सांगत विरोधकांना चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. मात्र देशभरातील काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया या नव्या आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरप्रश्नी संसदेत बोलावं अशी मागणी करत भाजपाच्या नेत्यांचे प्रस्ताव फेटाळून लावले. मात्र आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही संसदेत काहीही बोलले नाहीत यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींसह भाजपावर टीकास्त्र सोडले.

राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, सभागृहात आम्ही मणिपूर हिंसाचाराबद्दल बोलत आहोत. पण सभागृहाच्या बाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘INDIA’ ला ईस्ट इंडिया कंपनी म्हणत आहेत. काँग्रेस पार्टी पहिल्यापासून भारत मातेबरोबर राहिली आहे. भाजपाचे राजनैतिक वंशज हेच इंग्रजांचे गुलाम होते. पंतप्रधान मोदीजी, तुम्ही तुमच्या भाषणबाजीने देशाचे लक्ष दुसरीकडे वळवणं बंद करा” असा खोचक टोला खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

तसेच मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्विट करत पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदीजी, संसदेत येऊन मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल बोला. INDIA म्हणजे भारताला वाईट बोलून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नका अशी टीकाही केली. यावेळी त्यांनी ट्विटमध्ये राज्यसभेतील एक व्हिडीओही शेअर केला आहे.

संबंधित व्हिडीओत खरगे म्हणाले, मागील चार दिवसांपासून सभागृहातील अनेक सदस्य संसदेच्या नियम क्रमांक २६७ नुसार नोटीस देत आहेत. मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी लोकसभेतही केली जात आहे. आज मणिपूर जळतं आहे. महिलांवर बलात्कार होत आहेत. घरं जाळली जात आहेत. आम्ही सभागृहात मणिपूर हिंसाचारावर बोलत आहोत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाबाहेर ‘INDIA’ ला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ म्हणत आहेत.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *