Breaking News

अजित पवार यांनी निधी वाटपाचे सुत्र सांगताच एकच उसळला हशा…अखेर बहिण-भावाचे नाते… यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांनी अजित पवार यांना धारेवर धरले

मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्य सरकारच्या पुढील खर्चाच्या अनुषंगाने अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सादर केलेल्या मांगण्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांना विकास कामांसाठी देण्यात येणाऱ्या निधीबाबतच्या उठलेल्या चर्चांवर बोलताना अजित पवार यांनी विधानसभेत एक वक्तव्य केले आणि काही सेंकदासाठी पॉज घेतला. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी बाकावरील जवळपास सर्वच सदस्यांमध्ये एकच हशा उसळला.

तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसच्या आमदार महिला नेत्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांनी आक्रमक रूप धारण करत अजित पवार यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. परंतु अजित पवार यांनी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून देतो असे सांगत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले, गतवेळच्या अधिवेशनामध्ये आपण जवळपास ५२ हजार कोटींच्या मागण्या मंजूर केल्या होत्या. यावेळी आपण ४१ हजार कोटींच्या मागण्या मंजूर केल्या आहेत. त्यासंदर्भात ज्या ज्या विभागांसाठी खास तरतूद करण्यात आली. त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्याबाबत सविस्तर माहितीही दिली. परंतु राज्याला विकासाच्या मार्गावर न्यायायचे असेल तर त्यासाठीचा लागणाऱ्या खर्चाची तरतूद ही करावीच लागणार आहे. तसेच आमदारांना विकास निधींचे वाटप करताना २०१९, २०२० आणि २०२१ साली जे सूत्र वापरले ते सूत्र यावेळीही कायम ठेवण्यात आले असून त्यात बदल करण्यात आला नसल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी करत काही सेंकदाचा पॉज घेतला. यावरून सभागृहातील सत्ताधारी बाकावरील सर्वच सदस्यांमध्ये एकच हशा उसळला.

त्यावर विरोधी बाकावरील काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत त्यावेळी निधी वाटपाचे काय सूत्र होते आणि आता काय सूत्र आहे असा सवाल उपस्थित करत अजित पवार य़ांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

त्यावर अजित पवार म्हणाले, अहो ताई समजून घ्या ना, मला तुम्ही सावत्र भावाच्या नजरेतून बघताय असे सांगत म्हणाले, दृष्टीकोन बदला तुम्हाला सावत्र भाऊ दिसणार नाही अन् मी ही तुमच्याकडे सावत्र बहिण म्हणून बघत नाही असे सांगत यशोमती ठाकूर यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अजित पवार पुढे म्हणाले, आम्हाला कृषी महाविद्यालय द्यायचे होते. इथे सभागृहात मुख्यमंत्री सभागृहात बसले होते. धनंजय मुंडे हे ही होते. त्यावेळी आम्ही विचार केला नाही ते विरोधी पक्षाचे आहेत म्हणून आम्ही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना कृषी महाविद्यालयाची परवानगी देऊन टाकली.

त्यावर यशोमती ठाकूर यांनीही आक्षेप घेतला. त्यावर पुन्हा अजित पवार म्हणाले, तुम्हालाही देतो भाऊबीजेची ओवाळणी म्हणून असे सांगत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच अजित पवार म्हणाले आम्ही ही काही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलो नाही. जो पर्यंत जनाधार आहे. तोपर्यंत आम्ही सत्तेवर असू असे सांगत तोपर्यंत आम्हाला कोणीही हटवू शकणार नाही असे सांगितले. अजित पवारांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा सभागृहात एकच हशा उसळला.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इतर सत्ताधारी सदस्यांबरोबर या हास्यात सामील झाले. मात्र अजित पवार यांच्या बोलण्यात व्यत्यय आणणाऱ्यांपासून संरक्षण देण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, जे कोणी परवानगीशिवाय मध्ये उठून बोलतील त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही उत्तर पूर्ण करा अशी सूचना अजित पवार यांना करत इतर सदस्यांसोबत निर्माण झालेल्या हास्यात सहभागी झाल्याचे दिसून आले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *