Breaking News

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांना वेदांताबाबत आणि या प्रकल्पाबाबतही माहिती नाही

परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राजकारण चालूच राहील मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीवर लक्ष देणे गरजेचे आहे. चार प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. घटनाबाह्य सरकारमधील मंत्र्यांनी वेदांता प्रकल्प परत आणू सांगितले तसेच एअर बस प्रकल्प आणूच. परंतु वेंदांता बद्दल जस माहिती नव्हतं तसचं एअर बस बद्दल त्यांना माहिती नाही असा टोला युवासेनेचे प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे नाव घेता लगावला.

राज्यातील चवथा टाटाचा एअर बस औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला.
सुभाष देसाई उद्योगमंत्री असतांना एक समिती केलेली. जे उद्योग आहेत ते महाराष्ट्रातून जाता कामा नये. त्या समितीची बैठक घटनाबाह्य सरकारने घेतली नाही तीन महिन्यात असा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत आपले मुख्यमंत्री दहीहंडी, मंडळ, फोडाफोडी या व्यतिरिक्त काहीच केले नाही अशी टीकाही त्यांनी केला.

एअर बसच्या प्रकल्पावरून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रसाद लाड यांच्यावर मी काहीच बोलणार नाही. मविआ काळात सगळ्यांनी मिळून साडे सहा लाख गुंतवणूक आणली. दावोसला महाराष्ट्राने ८० हजार गुंतवणूक आणली. हे सरकार आल्यावर का अपयश येतय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

या खोके सरकारवर उद्योजक आणि इतरांचा विश्वास नाहीए. काल उद्योगमंत्र्यांनी कृषी खात्यावर tweet केलयं, कृषी मंत्री एक्साईजवर करतात. ५० खोके हे सर्वश्रुत अशी टीका करत राज्य सरकारवर विश्वास असेल तर उद्योजक राज्यात येतील असेही ते म्हणाले.

जगभरात वातावरण बदल यावर मोठी चर्चा सुरु आहे. सरकार मधून बाहेर पडल्यावर सुध्दा हा विषय मी बोलतोय कारण प्रत्येकाच्या जीवनाशी हा विषय निगडीत. प्रत्येक ठिकाणचे हवामान कसे असेल हे समजत नाही. ग्लोबल संस्थेसोबत काम करणे यावर विचार करणे गरजेचे. आताच चर्चा झाली पुण्यात ई-बसेस कश्या सुरु करता येईल. पुण्यात यंदा फार पाणी तुंबले यावर आयुक्तांशी चर्चा करणार असूनयातून मार्ग निघायला हवा. विकासामुळे दुसरीकडे काही परिणाम होतो आहे का? यावर संशोधन गरजेचे. दोन संस्था विकास करत असतांना समन्वय गरजेचा. यातून पाणी तुंबणे कमी होऊ शकेल. हिंदमाताला कुठेही पाणी तुंबले नाही. स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन काम करावे अशी आयुक्ताकंडे विनंती केली असून आयुक्त सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली.

इन्फ्रास्ट्रक्चरच काम होत असतांना एकत्र यावे लागेल. मी हस्तक्षेप करत नाहीए. अनेकांच्या सोबत पुण्यात चर्चा झाली. माझी आवड आणि भीती ही शहरीकरणाची असल्याचे सांगत महाराष्ट्रात साधारण ५२% शहरीकरण झाले असून पुणे, मुंबई, नागपूर यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *