Breaking News

एकनाथ खडसे म्हणाले,..तर मी तुमच्या बोकांडी बसेन

भोसरी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खडसे यांचे विरोधक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भोसरी प्रकरण उचलून धरलं आहे. भोसरी प्रकरणावरून थेट विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावरून एकनाथ खडसे यांनी सरकारला इशारा दिला.

एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, कामाच्या आणि संपर्काच्या बळावर तुम्ही ४० वर्ष मला साथ दिली. कामाच्याबाबत मागे राहणार नाही. त्यामुळे पुढच्या काळातही अशीच साथ राहु द्या. मात्र, विरोधकांना माझी अडचण होत आहे. आयुष्यभर एक रुपयाही गैर मार्गाने मी कमवला नाही असेही म्हणाले.

माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे आरोप करुन मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणूका सुलभ करण्यासाठी जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. पण, हे सर्व मी हाणून पाडत आहे. रोज मला व्हॉट्सअॅपवर ‘काहीतरी होणार आहे’, असे मेसेज येतात. मात्र, मला त्रास दिला तर, तुमच्या बोकांडी बसेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस यांना दिला.

दरम्यान, भोसरी प्रकरणात पुणे न्यायालयाने एकनाथ खडसे यांच्या अटकेरपासून दिलासा दिला. तसेच पोलिस यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय याप्रकरणात नव्याने चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *