Breaking News

शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना ही भाजपाच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे निदर्शक छत्रपती शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडण्याचा भाजपाचा हिन राजकीय प्रयत्न:- सचिन सावंत

मराठी ई-बातम्या टीम
भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करुन शिवरायांचा अवमान करत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडून नरेंद्र मोदींनी त्यावर कळस केला अशी तुलना करण्याची केलेली हिम्मत हे त्यांच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे निदर्शक आहे. भाजपाच्या या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचा तीव्र निषेध करत भाजपा व चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेत सचिन सावंत पुढे म्हणाले की, शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचा हिंदवी स्वराज्य, हिंदुत्वाची व्होट बँक याच्याशी संबंध जोडून चंद्रकात पाटील यांनी ‘तारे’ तोडले आहेत. भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कधीच आदर नव्हता. छत्रपतींचे राज्य हे भाजपा आरएसएसचे कधीच आदर्श नव्हते त्यांचा आदर्श पेशावाईच होता आणि आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ व विजय गोयल यांनीही यापूर्वी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केली होती. ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ नावाचे पुस्तक भाजपानेच प्रकाशित केले आहे ते पुस्तक अजून मागे घेतलेले नाही व त्यावर कारवाईही केलेली नाही. चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे असून त्याबद्दल महाराष्ट्राची जनता यांना कदापी माफ करणार नाही. भाजपा व चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सकाळी काही प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, शिवाजी महाराजांनीही हिंदू व्होट बँक तयार केली होती असे संतापजनक विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती महाराजांशी केली. पाटील यांच्या या विधानानंतर राजकिय क्षेत्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *