Breaking News

चंद्रकांत पाटील म्हणाले, हे सगळं भाजपाला घाबरून… सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी, निवडणूक प्रभारींची प्रदेशाध्यक्षांकडून नियुक्ती

राज्यातील विधानसभा निवडणूकीला अद्याप अडीच वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच महाराष्ट्रात नव्या राजकिय समीकरणांची जुळवाजुळवीच्या चर्चांना तोंड फुटले आहे. त्यातच एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिल्याने नव्या राजकिय समीकरणांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाला घाबरून या आघाडीच्या चर्चा सुरू झाल्याचा टोला महाविकास आघाडीला लगावला.

मात्र बघु या आता अजून कोणकोणत्या आघाड्या उदयास येतात. तरी पण भाजपाच एक नंबरचा पक्ष ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेने जनाब आधीच स्विकारले असून त्यांनी त्या अनुशंगाने अजाण स्पर्धा घेतल्याची आठवणही करून दिली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीसाठी केलेल्या नियुक्त्यांनुसार भाजपाचे कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. प्रदेशाकडून निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार धनंजय महाडिक आणि निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक संचालन समिती नियुक्त करण्याचे अधिकार या तीन नेत्यांना देण्यात आले आहेत.

शिवसेनेने ही जागा काँग्रेसला सोडली असल्याने आता भाजपा विरूध्द काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. काँग्रेसकडून या पोटनिवडणूकीसाठी अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र कोल्हापूरचे पालक मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज बंटी पाटील यांनी काँग्रेसकडून लवकरच उमेदवार जाहीर होईल असे सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *