Breaking News

राज्यपाल कोश्यारींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, छत्रपती शिवराय पुराने जमाके के…

भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल म्हणून आल्यापासून नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणान वाद निर्माण करतात. कधी सावित्रीबाई फुले यांच्यावरून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवरून तर कधी मुंबईतील परप्रांतीय नागरीक बाहेर काढले तर काय राहील असली वक्तव्य करत नेहमीच वाद निर्माण करत आले आहेत. इतकेच नव्हे तर राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरविलेला पेढा सर्वाच्याच चर्चेचा विषय झाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद ओढावू घेतला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. तुलना करुनही ते थांबले नाहीत तर छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं सांगत, “शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केले.
अगदी महिनाभरापूर्वी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात असलेल्या काळात मराठी माणसांना कमी लेखल्यामुळे राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले. आज गडकरी आणि पवारांचं मोठेपणा सांगताना राज्यपालांनी बोलण्याच्या नादात छत्रपती शिवरायांची तुलना थेट गडकरींशी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. याच कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

यावेळी पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले, गडकरी आणि पवार यांना पदवी देण्याचं मला भाग्य लाभलं. या नेत्यांचं कार्य राष्ट्राला उपयोगी असल्याने त्यांना ही पदवी दिली गेली. मात्र त्यांचे कार्य त्यापेक्षा अधिक आहे. शरद पवार यांनी शेती क्षेत्रात प्रचंड काम केलंय. त्यामुळे ते साखरेपेक्षा अधिक गोड वाटतात. नितीन गडकरी तर ध्येय असणारे नेते आहेत, त्यांना रोडकरी या नावानेही ओळखलं जातं. दोन्ही नेत्यांचं मोठं काम आहे असे म्हणाले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *