Breaking News

गेले अशोक चव्हाण कुणीकडे? जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेला गायब आज सोमवारच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा मुंबईत येताच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकते नाहीत. आयोजित केलेल्या महत्वाच्या पत्रकार परिषदेस चव्हाण यांनी दांडी मारल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अधिक खळबळ माजली आहे. आता हाही योगायोग असावा का असे बोलले जाते.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा रंगत असताना काँग्रेस नेत्यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाण आलेच नाही. या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह सोमवारी मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. अमित शाह यांनी या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी गणेश दर्शन घेतले.

अमित शहा यांनी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मनपाची निवडणूक कोणत्याही परीस्थितीत जिंकायची यादृष्टीने अमित शाह यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. मंत्री पदाधिकारी आमदार खासदार नगरसेवक यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.

अमित शाहच्या यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष असताना काँग्रेसच्या गोटात मात्र, अस्वस्थता पसरली आहे. दोनच दिवसांपूर्वी अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आशिष कुलकर्णी यांच्या वरळी मधील निवासी भेट घेतली. या भेटीनंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. मात्र अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या खोट्या आणि निराधार असल्याचं सांगितले. आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणेश दर्शनासाठी गेल्याचे चव्हाण यांनी सांगितले, त्यावेळी फडणवीसही पोहोचले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जाते. तो एक योगायोग होता असे बोलले जात आहे.

काँग्रेसने आज माजी मंत्री जितू पटवारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद बोलावली होती. काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची पत्रकार परिषद होती. मात्र, या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाण आलेच नाही. पत्रकार परिषदेत नाव असताना सुद्धा चव्हाण गैरहजर होते. अमित शहा यांचा दौरा असल्याने पत्रकार परिषदमध्ये गैरहजर असल्याचे बोलले जाते. या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण हे कॉग्रेस पक्ष सोडणार की काय याबाबत बोलण्याची शक्यता होती.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *