Breaking News

वडीलांच्या नावे चौक अन् चौकातच पत्रकाराला मुख्यमंत्री समर्थक आमदाराकडून मारहाण अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला किशोर पाटील यांच्या चेल्यांकडून भररस्त्यात गाडीवरून खाली खेचून मारले

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीचा प्रश्न विचारला म्हणून फोनवरून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सदर मुख्यमंत्री समर्थक किशोर पाटील यांनी त्या पत्रकाराला फोनवरून शिवीगाळ केल्याचा अभिमान असल्याचे छाती ठोकपणे सांगत होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार किशोर पाटील यांनी आज कहर करत आपल्या चेल्यांकरवी स्वातंत्र्यसैनिक महाजन यांच्या नावे असलेल्या पत्रकाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या चौकातच पत्रकार संदीप महाजन यांस त्यांच्या गाडीवरून खाली खेचून, रस्त्यावर पाडून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यापार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सदर घटनेचा व्हिडिओ शेअर करत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मुल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? असा उद्विग्न सवाल केला.

जळगाव जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. या प्रकरणावरुन स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी केली. ही बातमी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना चांगलीच झोंबली. त्यांनी पत्रकार महाजन यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांच्या समर्थकांनी आज पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केली. आमदारांच्या समर्थकांच्या गुंडगिरीचा राज्यभरातून निषेध होतोय.
पत्रकाराला फोनवर आई- बहिणीवरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची, का? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून… विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी आले असेल.

आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे. परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे.

किशोर पाटील समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पत्रकाराने केला आहे. याच प्रकरणावरून किशोर पाटील यांची बहीण आणि ठाकरे गटातील नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
एखाद्या आमदाराने पत्रकारच काय पण कुणालाही अशा पद्धतीने बोलू नये. पाचोऱ्याचा राजकीय वारसा सुसंस्कृत आहे. यापूर्वीच्या नेत्यांनी तो कायम ठेवला. आताच्या नेत्यांनीही तो वारसा जपला पाहिजे. बाळासाहेबांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतक्या घाणेरड्या भाषेत कुणाला शिव्या दिल्या नाहीत. या प्रकरणाला बाळासाहेबांचं नाव जोडणं योग्य नाही, असं म्हणत वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर आप्पांचे कान उपटले आहेत.

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी किशोर पाटील यांच्या वडीलांच्या पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गट-तटबाजूला सारत किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागतही केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

Telangana Election : मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन, जाणून घ्या, कोणत्या जागा विशेष !

Telangana Election : ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *