Breaking News

आणि अमित शाह यांचा दावा कलावतीने ठरवला खोटा मोदींकडून तर काहीच मदत मिळाली नाही जी काही मदत मिळाली राहुल गांधी कडून

काही वर्षापूर्वी राहुल गांधी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नी दौरा केला. त्यावेळी विधवा कलावती यांची भेट घेत तीला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच तात्काळ ३ लाख रूपयांची मदतही दिली. त्यावरून सध्याच्या केंद्रातील भाजपा प्रणित नरेंद्र मोदी सरकारने राहुल गांधी यांनी मदतीचे आश्वासन दिलेल्या कलावधी महिलेला भाजपाच्या मोदी सरकारने सगळ्या गर्जा भागविल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करत राहुल गांधी यांनी फक्त घोषणा देण्याचे काम केले. परंतु मोदी सरकारने त्याची पुर्तता करण्याचे काम केल्याचा दावा केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दाव्याला २४ तास पूर्ण होण्याच्या आतच काँग्रेस कडून कलावती या महिलेचा एक व्हिडिओ ट्विट करत व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कलावती या स्पष्टपणे सांगतात की, मला जी काही मदत मिळाली ती राहुल गांधी यांच्या मार्फतच मिळाली. त्यामुळे नरेंद्र मोदी वगैरे सांगत आहेत ते खोटं आहे असे सांगत अमित शाह यांचा दावा फेटाळून लावला आहे.

राहुल भाऊ (गांधी) जेव्हा आले तेव्हा त्यांनी सुरुवातीला ३ लाख रूपयांचा चेक दिला. त्यानंतर दोन दोन हजार रूपये काही काही लोकांनी बँक खात्यातून मिळाले. पण नंतर राहुल गांधी यांच्या मार्फत ३० लाख रूपये मिळाल्याचे कलावती यांनी सांगितले.

त्यानंतर कलावती पुढे बोलताना म्हणाल्या की, आता इतके दिवस झाले नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणतीही मदत झाली नाही. जी काही मदत झाली ती राहुल भाऊ यांच्याकडूनच झाली. त्यामुळे मोदी वगैरे जे बोलतायत ते सगळं खोटं आहे असेही त्या म्हणाल्या.

तसेच कलावधी पुढे म्हणाल्या की, ज्या माणसामुळे मदत झाली त्याच माणसाचं नावं घेणार ना असा प्रश्नात्मक सवाल करत एकदा राहुल गांधी यांना भेटायची इच्छा व्यक्त केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *