Breaking News

अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, देश बदलतोय… मोदी सरकारचे तोंड भरून कौतुक

भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्यानंतर आजपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनानिमित्त राज्यसभा आणि लोकसभा सभागृहाच्या दोन्ही सदस्यांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करताना राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, आपला देश बदलत असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे आता लोकांचा भारताकडे दृष्टीकोन बदलतोय. आपण ज्याची कामना करत होतो तो आधुनिक भारत आता घडू लागला आहे. देशात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बून लागलं असल्याचे सांगत मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती दौपदी मुर्मु म्हणाल्या, जो भारत पूर्वी स्वतःच्या समस्यांसाठी इतर देशांवर अवलंबून होता, तोच भारत आता जगभरातील दुसऱ्या देशांच्या समस्या सोडवू लागला आहे. आत्मनिर्भरतेमुळे भारत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. देशाचं सरकार भारताला भ्रष्टाचारमुक्त बनवू पाहात आहे, भारताला त्याचबरोबर एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनवणे हे आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन केले.

राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, भारतात मोठं डिजीटल नेटवर्क तयार झालं आहे. त्याचबरोबर देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळत आहे. भारत हा देश मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. या सरकारने विकासाचा पाया घातला आहे. भारतात एक स्थिर, निडर आणि निर्णायक सरकार कार्यरत आहे. हे सरकार इमानदार लोकांचा सन्मान करणारं आहे. त्याचबरोबर आधुनिकतेला चालना देणारं सरकार आहे असे कौतुकही केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आयुष्मान भारत योजनेने देशातील कोट्यवधी गरीबांचं कल्याण केलं आहे. आगामी काळात एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनणं हेच आपलं ध्येय असेल. भारत वैश्विक स्तरावर एक बलवान राष्ट्र बनू लागला आहे. आपल्या जागतिक भूमिका आत्मविश्वासाने पुढे नेणारं सरकार देशाला लाभलं आहे. त्याचबरोबर देशात आपली भ्रष्टाचारासोबत निरंतर लढाई सुरू आहे, देशात भ्रष्टाचाराचं उच्चाटन सुरू आहे. जगाला हेवा वाटेल अशी वाटचाल देश करत असल्याचे सांगितले.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *