Breaking News

अमोल मिटकरी म्हणाले, ज्यांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला…. आस्तिक की नास्तिक ठरविण्याचा अधिकार नाही

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नविधी लावताना म्हणण्यात येणाऱ्या मंत्राचा उच्चार करत त्याचा अर्थही सांगितला. त्यामुळे राज्यात वाद निर्माण होत अमोल मिटकरी यांच्यावर काही विशिष्ट समुदायाकडून टीकेची झोड उठविली. तसेच मिटकरी यांचा निषेधही करण्यात आला. यापार्श्वभूमीवर आजपासून गणेशोस्तवाला सुरुवात होत असताना काही राजकिय नेत्यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका करत ते धर्मविरोधी असल्याचे वक्तव्य केले. त्यास मिटकरी यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे धर्मविरोधी आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती. या टीकेला अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिले आहे.

मी आस्तिक आहे की नास्तिक हे ठरवण्याचा अधिकावर फक्त मला आहे. राज्यघटनेने मला ते अधिकार दिले आहे, असे ते म्हणाले. तसेच काही लोकांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला आहे, असा टोलाही त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

अमोल मिटकरी हा सर्वसामान्य वारकरी कुटुंबात जन्मला आहे. माझ्या घरी गेल्या तीन पिढ्यांपासून गणेशोत्सव सुरू आहे. काही लोक माझ्यावर आजही टीका करतात, मला धर्मविरोधी म्हणतात. मात्र, त्यांच्याकडे आजही दीड दिवसाचा गणपती बसतो. मात्र, मी पूर्ण दहा दिवसाचा गणपती बसवतो, असे प्रत्युत्तर त्यांनी टीकाकारांना दिले.

काही लोकांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला आहे, अशा लोकांना माझ्यावर बोलायचा अधिकार नाही. मी आस्तिक आहे की नास्तिक हे ठरवण्याचा अधिकावर फक्त मला आहे. राज्य घटनेने मला ते अधिकार दिले आहे असेही ते म्हणाले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *