Breaking News

बी पॉजिटीव्ह अमित तात्या… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावाधारीत काल्पनिक कथा

अमित तात्या लहानपणीच मुंबईला पळून गेला, साधारण दुसरीत असताना किऱ्याचं डोकं फोडलं भळाभळा येणार रक्त बघून मास्तर, किऱ्याचा बेवडा बाप आणि त्याही पेक्षा अस्सल बेवडा आपला बाप आपल्याला जिवंत ठेवणार नाही, याची भीती मानत  ठेऊन अमित मुंबईत  जाणाऱ्या गाडीमध्ये बसला. मुंबईत रस्त्यावर झोपला असताना,  एका धार्मिक संघटनेचे लोकं येऊन आम्ही तुला आम्ही सगळं पुरवू आमच्या आश्रमात चल म्हणून घेऊन गेले. पोटाची भूक आणि डोक्यावर छप्परापुढे धर्म सुई एवढा आहे,  ही समज त्याला त्याच क्षणी झाली. आश्रमात हवं ते खायला मिळतं होते. हवं ते करायला मिळत होतं नेहमीच्या शिकवणी पेक्षा इथे एकच गोष्ट ती म्हणजे धर्म माणसापेक्षा श्रेष्ठ  आहे. माणूस मेला तर चालेल धर्म जगला पाहिजे. अमित याच विचाराने हिंसक होत गेला. आपल्या धर्माहून इतर धर्मातली माणसं नीच आहेत. आणि त्याबद्दलचा राग त्याच्याही नकळत त्याच्या मनात वाढतं  गेला.

अमित हळूहळू दंगलीत सहभागी होऊ लागला. किऱ्याच्या डोक्यातून भळभळणारं रक्त बघून आयुष्यापासून पळणारा अमित आज रक्त बघितल्या खेरीज सूर्याला मावळूच दयायचा नाही. वर्षामागून वर्ष जाऊ लागली. राजकीय पक्षाचं काम येऊ लागलं. राजकारणात त्याच्या अख्या आयुष्याचा अनुभव म्हणजे पक्षाचा विजयच.

अमित  टीव्हीवर प्रवक्ता म्हणून जाऊ लागला. भडकाऊ भाषण, लोकांमध्ये धार्मिक मुद्द्यावर फूट, अल्पसंख्यांक समाजाविषयी चीड, अश्या बऱ्याच रस्त्यांवर चालल्यानंतर अमित तात्याना राजकीय माणूस म्हणून ओळख मिळाली. सुरुवातीला अमित तात्या दिवसा चांगली कामं करण्याचा आव आणायचा तो आता दिवसा ढवळ्या, धार्मिक स्थळ उध्वस्त कारण्यापासू ते अगदी न्यायाधीशाची हत्या इथपर्यंत सफेद पोशी काळी कामं करू लागला. तडीपार नावाचा कपाळावर शिक्का लागल्यापासून अमित तात्यांच्या लक्षात आलं धर्माचं वस्त्र पांघरल्याशिवाय पर्याय नाही.

घाणेरडे शरीर लोकांच्या डोळ्यांना दिसणार नाही आणि दिसलच तर धर्माच्या भीती पोटी लोक दुर्लक्ष करतील. कारण इथला समाज धर्माच्या आड केलेली काळी कृत्य सहज  पचवतो आणि पचवत नसेल तर माझ्यासारखे कित्येक पराक्रमी राजकीय योद्धा गटारात नाहीतर देवळाच्या उंबऱ्यात भीक मागत बसले असतें. अमित तात्यांनी खासदारकीला शहरातून उभं राहायचा विचार केला. अमित तात्यांनी मग वेगळी कहाणी रचून पब्लिसिटी स्टंट केला, इतक्या वर्षात म्हाताऱ्या आईला न भेटलेला अमित तात्या आता मीडिया सोबत कॅमेराच्या समोर आईच्या पायाशी लोटांगण घालून बोलू लागला. अमित तात्याची सगळी प्रकरण माहिती असली तरी, धर्माच्या नावावर अमित तात्यांनी निवडणूक जिंकली.

तात्यासमोर माईक समोर बोलताना हिंदी सिनेमातला गुंड बोलतोय की काय असा  प्रश्न  पडायचा. म्हणून तात्या समोर कमी पडद्या मागून मोठं मोठ्या करामती करून देशाच्या उच्चपदी विराजमान झाले. तात्या नेहमी विरोधी पक्षाला नावं ठेवत. तात्या एकच म्हणायचे की, विरोधी पक्षाने गेल्या काही दशकात काहीच नाही केलं, म्हणजे विरोधी पक्ष पादला सुद्धा नाही, अशी अमित तात्यांची भावना गेल्या सहा सात वर्षात पृथ्वी निर्माण झाली आणि जे काही बदल झाले ते आम्ही केले असं तात्यांच म्हणणं.  आणि या सगळ्यांचा प्रवाह धर्माच्या नाल्यात सोडला की, लोकांनाही तात्यानेच भारताची निर्मिती केली असा वाटू लागलं. तात्यांनी या आधीच्या सरकारने उभ्या केलेल्या अनेक संस्था विकायला काढल्या. अमित तात्या एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा अस्वस्थ झाले. जगावर कोरोनाच संकट आलं हे कोणत्या दवा गोळ्यांनी होणार नाहीतर ताट वाजवून दिवे पेटवून देवाची आराधना करून जाईल असा दाट विश्वास असताना देखील अमित तात्यांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला.

लोकं विश्वास  ठेवायला  तयार  नाहीत. अमित तात्यांची आता मोठी गोची झाली इतके दिवस आपण ज्या पक्षाला शिव्या घालत होतो की, या पक्षाने घंटा काही केलं नाही, घंटा काही केलं नाही.  त्या पक्षाने बांधलेल्या हॉस्पिटल मध्येचं आपल्याला अॅडमिट व्हावं लागणार.

शेवटी जीवाचा प्रश्न असल्यामुळे अमित तात्या विरोधी पक्षाने घंटा काही नाही केले म्हणून विरोधी पक्षाने तयार केलेल्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. बरं मीडिया हागल्या मुतल्याची बातमी देणारा आज अमित तात्यांची लाज जाऊ नये म्हणून शांत आहे. आता मात्र लोकं अमित तात्यांच्या वाह्यात राजकारणापासून सावध होऊ लागले आहेत. तात्याचे भक्त ही शांत. स्मशान शांतता खायला उठल्यागत दिसून येते. आता तात्या सुद्धा आपण बरं व्हावं यासाठी विरोधी पक्षाच्या पायाच लोटांगण घालत असावे. कारण तात्याच्या भक्तांनी ते आधीच सुरु केलय. आता बरेच से लोकं तात्या ज्यांना शिव्या घालायचे त्यांच्याच हॉस्पिटल मधून जिवंत येतो कि मेलेला याची अतूरतेने वाट पाहत आहेत.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *