Breaking News

पर्स नाही काही नाही ते उंदीर झालेत नां घरात पर्स नवीन हाय

तपू आज नेहमी पेक्षा स्थिर नव्हती तीचं कामात जराही लक्ष नव्हतं. ती सारखं सारखं आपल्या पर्सकडे बघत होती. घर पत्र्याचं. पत्र्याला छिद्र पडलेली. कोणी डोळा लावला तर अख्ख घर त्याच्या डोळ्यात बसेल. तपू चा नवरा सफाई कामगार. दारू घेतल्याशिवाय तो गटारात उतरत नसे. आयुष्यभराचा वनवास भोगून आल्या नंतर. नवऱ्याच्या घरात ही तो वनवास तसाच सुरु राहिला.

बबन ची मुंबईत स्वतःची झोपडी आहे म्हणून तपूच्या बापाने तीचं लग्न लावून दिलं. त्यात सफाई कामगार असला तरी बबन सरकारी नोकर आहे असं त्याने सांगितलं खरं पण तो कॉन्ट्रॅक बेस वर कामाला होता.त्यामुळे नवरा कितीही वाईट असला घाणेरडा असला तरी सरकारी नोकरीत आहे म्हणून कुठच्या पोरीच्या बापाला धीर असतो. बबन सकाळी कामावर जाऊन आला कि दिवसभर त्या सडलेल्या गादीवर पडलेला असायचा रात्री त्याच गादीवर तपूला झोपावं लागायचं त्याच्या दारूचा वास, सडलेल्या गादीचा वास आणि आजूबाजूला असणाऱ्या गटारांचा वास तपूच्या डोक्यात भिनला होता. तिला काही करून इथंनं बाहेर पडायचं होतं, मुलगा प्रतीक ला शिकऊन मोठं करायचं होतं. पण आज तिचा चेहरा नेहमी पेक्षा घाबरा होता. ती सतत आपल्या पर्स ची जागा बदलत होती.

जेवणं बनवताना. भांडी घासताना, कपडे धुताना, सतत ती त्या बॅगेकडे पहात होती. आरव तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो ” मम्मी काय आहे पर्स मध्ये ” तपू भानावर येतं म्हणते ” नाही काही नाही ते उंदीर झालेत नां घरात पर्स नवीन हाय, म्हणून, लक्ष ठेव तु पण ” आरव ला तीचं उत्तर समाधान कारक काही वाटत नाही, रात्री त्या गादीवर झोपत नाही आरवच्या जवळ जाते, आरव तिला बोलतो ” मम्मी मला इथं कंटाळा आलंय आपण प्रज्ञेश राहतो तिकडे जाऊया का तिथं, जवळच बाजूला रस्ता आहे तिथं पॉपकॉर्न चे, चायनीज चे, जूस चे भारी भारी वास येतात, त्यांच्याकडे उंदीर सुद्धा येत नाहीत असं तो म्हणाला, तिथं संध्याकाळी लहान मुलं जमा होऊन खेळतात, अभ्यास करतात. गार्डन आहे. कपड्याची दुकानं आहेत. हे ऐकत असताना तपूच्या डोळ्यात पाणी येतं. आणि ती त्याला आपण लवकरच जाऊ असं सांगते आरवला हे नेहमी सारखंच उत्तर वाटतं. तो हसतो आणि झोपून जातो.

तिला काही केल्या झोप लागेना उशिखाली ठेवलेली. पर्स पुन्हा पहाते. करकचुन मिठीत घेते. बबन आरव झोपल्याच बघून डिम लाईट लावते मोरीत जाते आणि पर्स उघडते. त्यात नोटांची बंडलं असतात. तिला मोजता मोजता घाम सुटतो. पाच लाख पेक्षा जास्त पैसे असतात. आणि तिला आठवतं, आपण ज्यांच्याकडे नेहमी कामाला जातो तो एका राजकीय पक्षाचा नेता आहे, काल त्याच्या घरात खूप मोठी पार्टी होती.

सकाळी जेंव्हा गेलो तेंव्हा चार पाच माणसं, बाया उघड्या पडल्या होत्या, सगळं अस्तव्यस्त झालं होतं. कपडे बाटल्या, चिकन मटणाची हाड इकडे तिकडे पडली होती, एका बाजूला एक उलटी करून तिथंच झोपला होता, त्यातला एक हळू हळू उठण्याचा प्रयत्न करत होता. त्याला माहीत नाही तपू आहे कि कालचीच कोणीतरी मुलगी आहे. तो प्रचंड धुंदीत आहे तो आपल्याला म्हणाला होता “ए मला खाली सोड ” मी त्याला तिथलेचं तो जसं सांगत होता तसें कपडे काय काय आहेत त्यावरून काढून देत होते . त्याने आपली काळ्या कलर ची चामड्याची बॅग आहे ती पण द्यायला सांगिगली होती. त्याने आपल्या एका खांद्यावर हात ठेऊन तो पूर्ण वजन माझ्यावर टाकून त्याला खाली टॅक्सी जवळ आणला होता आणि त्याला आपण विचारलं होतं कुठं जायचंय ते त्याला नीट सांगता येत नव्हतं तो बेशुद्धीत टच बोलला “येस्स डार्लिंग मजा आली रात्री “टॅक्सीत बसता बसता त्याच्या हातात सॅक देता देता पडली त्या बॅगेतून एक पिशवी बाहेर पडली आणि गाडी गेल्यावर आपल्या लक्षात आलं होतं तपू.

तपू आठवणीतून बाहेर येते. येऊन ती पर्स उशाला घेऊन झोपते. तिला रात्रभर झोप लागत नाही. सकाळी उठून आवारावर करून बँकेत जाते बँकेत पैसे भरते. बँक वाले इतके पैसे कुठूनआले म्हणून विचारतात. गावाकडची जमिन इकली त्याचं पैशे. पोराच्या शिक्षणासाठी आले मुंबईला. बॅंकवाले पण इतकं काही विचारत बसत नाही. घाबरत घाबरत कामावर जाते. तोच माणूस आणि तपू ज्यांच्याकडे कामाला जाते तो माणूस निवांत गप्पा करत बसलेले तिला दिसतात नेहमीसारखं. तपू काम आटपून मुद्दामून विचारते साहेब आतां कधी पार्टी आहे. साहेब बोलतो तपू सॉरी तुला त्या दिवशी त्रास झाला असेल. हा पण पाच सहा दिवसात परत पार्टी आहे. तपू हसते आणि साहेब ही हसायला लागतो तपू काहीसं मागच्या वेळेस झालं तसंच व्हावं अशी स्वप्न रंगवत बाहेर येते.

लेखन-सुदेश जाधव

Check Also

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *