Breaking News

Tag Archives: sudesh jadhav

पर्स नाही काही नाही ते उंदीर झालेत नां घरात पर्स नवीन हाय

तपू आज नेहमी पेक्षा स्थिर नव्हती तीचं कामात जराही लक्ष नव्हतं. ती सारखं सारखं आपल्या पर्सकडे बघत होती. घर पत्र्याचं. पत्र्याला छिद्र पडलेली. कोणी डोळा लावला तर अख्ख घर त्याच्या डोळ्यात बसेल. तपू चा नवरा सफाई कामगार. दारू घेतल्याशिवाय तो गटारात उतरत नसे. आयुष्यभराचा वनवास भोगून आल्या नंतर. नवऱ्याच्या घरात …

Read More »

मंदिर बंद… संवेदनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

गांव देवी मंदिराच्या पुजाऱ्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. अख्खा गाव गोळा झाला आणि देवळाच्या पटांगणात जमा होऊन गांव देवीने पुजाराच्या पोटाची समस्या दूर करावी म्हणून प्रत्येकजण प्रार्थना करू लागला.  पण फरक काही पडला नाही. गावातल्या तज्ञ मंडळींनी पुजाऱ्याला डॉक्टरकडे नेण्याची विनंती केली, पण पुजारी काही केल्या डॉक्टरकडे जाईना पुजाऱ्याचं म्हणणं …

Read More »

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण नसल्यामुळे आणि आम्ही टोपलं दिलं तरी उचलू या मानसिकतेमुळे कोणी ऑफिसातल्या मऊ गादीवर आपलं हडकुळ बूड टेकवू शकलं नाही. आणि गाव वाले आपल्याला नोकरी मिळाली बाकी ठेकेदार किती घेतो ? काय करतो ? याचं कोणाला काही पडलेलं …

Read More »

दे–ही शेतकरी… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारित काल्पनिक कथा

कल्पेशने पुन्हा एकदा पेटी उघडली, प्लास्टिकच्या पिशवीत दोन तुकडे झालेलं पासबुक बघितलं. काहीसा विचार केला पुन्हां पासबुक पाहून तसंच पेटीत ठेवलं. रडणाऱ्या पोरीला शांत पाळण्यात झोपवलं आणि उठून शेतावर निघाला. चालताना रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत राहिला, “बँकेत जाणार हायस का रं? ” कोणी हो बोलें पण कामं असल्यामुळे कल्पेश बँकेतलं त्याचं काम सांगण्या आधीच …

Read More »

ऑनलाईन क्लास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावाधारीत काल्पनिक कथा

चंद्या लहानपणापासून मुंबईत राहतो बापाने रूम  विकली आणि दोन पोरांची लग्न लावून दिली. दोन मुलं वेगवेगळी राहायला लागली. पोरांना रूम घ्यायला थोडी मदत केली, एक प्रायव्हेट कंपनी आणि एक बीएमसीत सफाई कामगार म्हणून चंद्याला चिपकावलं. चंद्याला पहिली मुलगी झाली तीच श्रुती नाव ठेवलं, दुसरीही मुलगी झाली. चंद्या मात्र या पोरींवर नाराज झाला, म्हणून शेवटचा चान्स घेऊन मुलगा झाल्याझाल्या चंद्याला अख्खी झोपडपट्टी पायदळी तुडवल्यागत झाली. चंद्या विक्रोळीत राहायचा दहा बाय दहापेक्षा एकदम छोटी रूम. …

Read More »

नेमकं काय पाहावं…? व्यथा एका सुजान नागरिकाची : सर्जनशील लेखक सुदेश जाधव

पुन्हां पुन्हां लाईट जाणं आणि अंगाला दरदरून घाम फुटणं आता अंगवळणीच पडू लागलंय. जगाशी घेणंदेणं नाही  असं स्वतःला समजावून खोट्याने पुन्हां त्याच जगाच्या अंगणात हातपाय पसरून सल्ले देणं आता कमी केलं  पाहिजे. म्हणून आता अंगणात ही जावेना. खूपदा लाईट जाते येते. त्यामुळे टिव्हीवरचं जग मोठ्या गॅप नंतर बांधणं कठीण होऊन …

Read More »

राजा आणि मोर… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारित काल्पनिक कथा

आटपाट नगरात एक राजा राहायचा. हा राजा बरीच वर्ष जंगलात राहिला, असं त्याचं म्हणणं. पुराव्यासाठी बरेचसे फोटो त्याने प्रजेपुढे ठेवले. प्रजेने विश्वास ठेवला आणि राजाने आपला फोटो वॉट्सअप डीपी ठेवला. राजा खरंच जंगलात होता का यावर शंका उपस्थित करणाऱ्यांचे राजाने राजद्रोहाचा आरोप ठेऊन त्यांना इतर प्रजेपेक्षा नेहमी अपमानकारक वागणूक दिली. राजा राज गादीवर बसण्यापूर्वी आपण जंगलात साधू म्हणून …

Read More »

बी पॉजिटीव्ह अमित तात्या… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावाधारीत काल्पनिक कथा

अमित तात्या लहानपणीच मुंबईला पळून गेला, साधारण दुसरीत असताना किऱ्याचं डोकं फोडलं भळाभळा येणार रक्त बघून मास्तर, किऱ्याचा बेवडा बाप आणि त्याही पेक्षा अस्सल बेवडा आपला बाप आपल्याला जिवंत ठेवणार नाही, याची भीती मानत  ठेऊन अमित मुंबईत  जाणाऱ्या गाडीमध्ये बसला. मुंबईत रस्त्यावर झोपला असताना,  एका धार्मिक संघटनेचे लोकं येऊन आम्ही तुला आम्ही सगळं पुरवू आमच्या आश्रमात चल म्हणून घेऊन गेले. पोटाची भूक आणि डोक्यावर छप्परापुढे धर्म सुई एवढा आहे,  ही समज त्याला त्याच क्षणी झाली. आश्रमात हवं ते खायला मिळतं होते. हवं ते करायला मिळत होतं नेहमीच्या शिकवणी पेक्षा …

Read More »

भूमीपूजन… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवावरील कल्पनाधारीत कथा

दिन्या पुन्हा एकदा पेपरातले फोटो पाहू लागला . पेपराचे फाटलेले तुकडे पुन्हा पुन्हा तो जोडून जोडून रंग उडालेला चेहरा शोधत राहिला. दिन्या एका धार्मिक संस्थेचा कट्टर भक्त होता. बाबरी मस्जिद  पाडताना असंख्य विटा आपण कशा फेकल्या, किती जणांची डोकी फोडली याचा हिशोब तेंव्हापासून पोरं जनमल्या जनमल्या पोरांच्या जणू कानातच सांगायचा. …

Read More »