Breaking News

प्रिय चेतन भगत, धर्मनिरपेक्षतता हा काही तितकासा वाईट नाही तर सुंदर शब्द आहे लेखन:स्वामिनाथन एस.अंकलेश्वरीया अय्यर

तु जे काही तुझ्या कॉलममध्ये लिहितोस ते मला आवडतं. परंतु तु नुकताच लिहिलेला “Hate smug liberals? But don’t hate secularism just because they like it” अर्थात ‘आत्मसंतुष्ट उदारमतवाद्यांच्या तिरस्कार? परंतु धर्मनिरपेक्षितेचा तिरस्कार करू नका कारण त्यांना ते फार आवडते’. उदारमतवादी लोक आत्मसंतुष्ट असण्याबाबत मला माहिती आहे. मात्र मला सर्वाधिक काळजी आहे ती वाढत्या तिरस्कारीक भावनांची धर्मांधतेची. खरेतर आत्मसंतुष्टता ही आता हिंदू समुदायामध्ये आली असून त्यांना वाटते की आता आपली वेळ आलीय.

तुझ्या सांगण्यानुसार सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष हा शब्द वाईट शब्द बनला आहे. जमावही आता या शब्दावर हसत असून त्याचा sickularism असा उल्लेख करत आहेत. या शब्दाला श्बदकोषही मर्यादा घालू शकत नाही. देशातील ४ मिलियन लोकांना धर्मनिरपेक्षता हा शब्द प्रेमळ वाटत असून त्याचे एक मुल्य आहे. तसं तुझंही बरोबर आहे म्हणा, देशात असलेल्या जाती धर्माचा जो काही पदर आहे त्यास भाजपा नेहमीच नियंत्रित करत आला आहे. धर्मनिरपेक्षता या शब्दाच्याबाबत नेहमीच एक मिथक तयार करण्यात येत असून एक तर हिंदू विरोधी किंवा अधार्मिक म्हणून. परंतु त्याचा शब्दकोषात अर्थ पाहिला तर त्यांचे मिथक किती खोटे आहे हे कळेल. या खोट्या आधारांच्या आधारे जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याऐवजी उलट त्यातला खोटेपणा शोधून उघडकीस आण.

हिंदूत्वाच्या अनेक लाभार्थ्यांकडून एक नवा वाक्यप्रचार सुरु केला असून तो ‘Lutyens Delhi’ नावाने आहे, आणि त्याचे वर्णन हे डावी धर्मनिरपेक्षता असे करतात. धर्मनिरपेक्षता म्हणजे डावी विचारसरणी नाही. माओवादी इच्छा स्वातंत्र्यावादी विचारवंताकडून हा शब्द तशा पध्दतीने वापरला आहे. तु सांगतोयस की Lutyens जमावाने खाली-वर पहावं आणि तुझ्यावर हल्ला करावा. कदाचीत डावे जे शिक्षित धर्मनिरपेक्षवादी आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्या गटाकडूनच असे होईल.

मी सुध्दा दशकांपासून समाजवाद आणि मार्क्सवादाशी लढत आलोय त्यामुळे मला भांडवलशाहीचा पळपुटा कुत्रा आणि अमेरिकन एजंट म्हणण्यात येते. समतावादी धर्मनिरपेक्षितता आणि मुर्ख डाव्या विचारसरणीचे तु आणि मी पुरावे आहोत. धर्मनिरपेक्षतेची मुळ संकल्पना ही पाश्चिमात्य भाडंवलशाही देशातून आलेली मुळ संकल्पना असून ती काही दास कॅपिटलमधून आलेली नाही. त्याच भांडवलशाही देशांनी धर्मनिरपेक्षततावादी मानवी हक्काची प्रतिष्ठापणा युनोच्या यादीत केलीय.

तु सातत्याने धार्मिकतेवर देशाची विभागणी करू नका ते धोकादायक असल्याचे म्हणतोस परंतु धर्माधतांवर हल्ला करू नका असे सांगतोयस. त्यानंतर तु धर्मनिरपेक्षतेऐवजी एक अखंड भारत ही संकल्पना येईल या बचावात्मक पवित्र्यात तु जातोस.

परंतु मला माफ कर ज्या धर्मनिरपेक्षततेसाठी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या कृतीला विजश्रीची माळ चढविणाऱ्यांकडून ते इतकं सहजशक्य होणारं नाही. गोडसेची नेहमीच धर्मनिरपेक्षततेच्याबाबत तिरस्काराची भावना राहीली असून त्याला कधीच एक अखंड भारत ही संकल्पना अंगिकारता आली नसती त्याच्या राजकिय विचारधारेच्या वारसांना ही स्विकारली नाही.

धर्मनिरपेक्षततेपासूनच पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते सुभाषचंद्र बोस ते सरदार वल्लभभाई पटेल ते सी गोपालचारी यांनी प्रेरणा घेतली. सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या सैन्य दलाचे नाव स्वतंत्र भारत सेना असे नाही ठेवले ते त्यांनी आझाद हिंद फौज (हे तिन्ही शब्द उर्दु आहेत.) असेच ठेवले. त्यांच्यासाठी हिंदू-मुस्लिमांची एकता ही स्वातंत्र्या लढ्यासाठीचे प्रतिक होते. ट्विटरवर मुस्लिम विरोध करणाऱ्यासारखे नव्हते.

तरीही याच्या उलट फारपूर्वी भाजपाने स्वत:ला पूर्णत: धर्मनिरपेक्ष असल्याचे जाहिर केले हे एक मोठे व्यंग आहे. भाजपा सदस्यत्वाचा अर्जात मी धर्मनिरपेक्ष राज्य आणि देशाला अंगीकृत करतो ना की धर्माच्या आधारावर असे नमूद करण्यात आल्याची माहिती आकार पटेल यांच्या “Our Hindu Rashtra” या पुस्तकातून बाहेर आली आहे. याच भाजपाची घटना सांगते की पक्ष म्हणून आम्ही भारतीय राज्यघटनेतील कायद्यानुसार स्थापन झालेल्या समाजवाद, धर्मनिरपेक्षतता आणि लोकशाहीवर पूर्ण विश्वास असल्याचे वचन पक्षाच्या घटनेतच दिलेले आहे. मात्र प्रत्यक्षात भाजपाकड़ून भारतीय राज्यघटनेत सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेची अंमलबजावणी करत नाही. तरीही चेतन तु धर्मनिरपेक्षतता हा वाईट शब्द आहे असा विचार करतोयस का?

भाजपाची पाच तत्वे असून त्या आधारेच ते राजकिय मार्गदर्शन घेत आहेत. त्यातील पहिले, गांधींच्या समाजवादाशी त्यांनी स्वत:ची बांधिलकी मानली आहे, दुसरी बांधिलकी सर्वधर्म समभाव, काहीजण यास सकारात्मक धर्मनिरपेक्षतता असे म्हणतात. याचे शब्दश: भाषांतर करायचे झाल्यास सर्व धर्म सारख्याच शेवटाकडे घेवून जातात. या धर्मनिरपेक्षतेतीच्या  संकल्पनेच्या सुंदरतेवर पहिल्यांदा प्रकाश टाकला तो स्वामी विवेकानंद आणि श्री रामकृष्ण यांनी, तार्किक पध्दतीवर पाहायचे झाले तर दोन्ही महापुरूषांना Sickularism या हास्यास्पद नावाखाली ट्रोल करता येवू शकेल. परंतु त्यांचा तार्किकदृष्ट्या तिरस्कार करता येणार नाही.

भाजपाचे नेतृत्व करताना पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपा हा पूर्णत: धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचा दावा केला. तर काँग्रेसची धर्मनिरपेक्षतता ही स्युडो-सेक्युलॅरिझम असल्याचा आरोप करत राहीले. त्यासाठी या दोघांकडून धार्मिक अल्पसंख्याकांचा मतं मिळविण्यासाठी वापर आदी आरोप काँग्रेसवर करत आम्ही मात्र या गोष्टी करत नसल्याचा नेहमीच दावा केला. तसेच आम्हीच खरे धर्मनिरपेक्ष असा दावाही केला. ते दिवस गेले आता. कदाचीत आता धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरल्याने एखादा राजकिय पक्ष ट्रोल होवू शकतो आणि त्याच्या शब्दावर Sickularism अशी हेटाळणीही होवू शकते. त्यामुळे मुलतत्ववादी हिंदू यामुळे मध्यवर्ती येवू शकतात.

भाजपामध्ये झालेल्या या अंतर्गत बदलामुळे कदाचीत भाजपा उघडपणे धर्मनिरपेक्षततेचा उघड विरोध करू शकत नाही. त्यामुळे युनोच्या मानवी हक्क यादीतील तरतूदींचा भंग होईल आणि जसे नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना जशी बंदी घालण्यात आली होती तशी बंदीही अमेरिकेकडून घातली जावू शकते. याशिवाय चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी जर खरंच भारताला लोकशाहीवादी देशांची मदत घ्यायची असेल धर्मनिरपेक्षततेपासून पळ काढणे भारताला कधीच फायद्याचे असू शकणार नाही. त्यामुळे चेतन तु धर्मनिरपेक्ष हा शब्द वाईट आहे असे म्हणतोस ते चुकिचे किंवा अपराधीपणाचे आहे.

(आज संडे टाईम्स मध्ये Dear Chetan, Secular isn’t bad, its beautiful या नावाने प्रसिध्द झालेला लेख-खुले पत्र आहे. त्याचा अनुवाद)          

Check Also

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *