Breaking News

हँडीकॅप लोकल रेल्वेचा प्रवास

जमील आज घाई घाईत उठला त्याच्यासाठी आज महत्वाचा दिवस होता. खूप दिवसांनी त्याला आज इंटरव्हिव ला जायचं होतं. रोशन लॉकडाऊनला रोशन ची नोकरी गेल्या नंतर त्याला. जी हवी, जशी हवी तशी नोकरी मिळेना. बिल्डिंग मध्ये राहायचा. पण एका वेळेनंतर भाडं देणं त्याला मुश्किल झालं. त्यांने भाजीचा गाडा टाकाला, पण तो ही पैसे त्या जागेचे आणि हप्ता याच्यात जाऊ लागले ते सोडलं.एक नोकरी आलेली तिथे दहा हजार पगार पण सध्या राहतो तिथून तिनं तासावर होतं आणि कामाच्या आजूबाजूला एखादी रूम पाहावी तर ते पगाराच्या दुप्पट होतं. ते ही जमेना.

अखेर आज त्याला हवी तशी नोकरी मिळणार होती. तो सकाळी उठल्यापासूनच स्वप्न रंगवीत होता. त्याच्या स्वप्नातलं घर, एक प्रेयसी आणि त्याचा सुखी संसार. त्याला खात्री होती यावेळेस निराशा येणार नाही.

जमील घाई घाईत नाष्टा केला, आणि घराच्या बाहेर ट्रेन ला निघाला. सकाळची आठ ची वेळ होती त्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांची प्रचंड वर्दळ होती. एरवी हां किचाट जमील ला सहन व्हायचा नाही पण आज तेच आवाज त्याला ऐकू येईनासे झाले. त्याला गर्दी एक संगीत वाटू लागलं, तसा तो एक तास आधीच निघाला होता. स्टेशन वर पोचला. पाहतो तर प्रचंड गर्दी या नंतर ची गाडी गाडी पकडू असं निर्धार करून गर्दीच्या थोडा मागेच उभा राहिला, एक एक करता करता पाच सहा ट्रेन सुटतात गर्दी काही कमी व्हायचं नाव घेईना, जमील ला गर्दी पाहिली कि श्वास कोंडतो म्हणून, तो कधीच गर्दीच्या ठिकाणी आजपर्यंत थांबला नव्हता पण आज मेलो तरी बेहत्तर हां मनाशी ठाम विश्वास बाळगुन कसही करून त्याला इंटरव्युव्ह साठी पोहोचयचं होतं. गर्दी काही कमी व्हायचं नाव घेईना वेळ वाढत होता तशी गर्दी त्यावेगाच्या दुपटीने वाढत होती. शेवटी जमील विचार करू लागतो कि. हँडीकॅप डब्ब्यातून जाऊ या. मनात भीती होती तरीही आता त्याच्याकडे दुसारा काहीच पर्याय नव्हता.

तो गर्दीच्या मधोमध जाऊन उभा राहिला. गाडी आली आणि तो गर्दीचा लोंढा त्याला आपसूक आत घेऊन गेला. हँडीकॅप डब्ब्यात सुद्धा प्रचंड गर्दी होती. जमील ने कसा बसा दरवाजाच्या दोन पावलं पुढे जाऊन एक भला मोठा श्वास घेतला. गर्दी वाढत होती. तसा जमील ला गर्दी पुढे पुढे सरकावत होती. एक साठ वर्षाचा व्यक्ती सीट च्या कोपऱ्यावर बसलेला होता जमील चा त्याला थोडा पाय लागला. त्याने म्हाताऱ्याने डोळे वटारुन जमील कडे बघितलं. जमील त्याला सॉरी म्हणाला. पुढच्या स्टेशन ला. गर्दी अजून वाढली. बाकी सगळे हँडीकॅप त्याच्याकडे डोळे वटारुन बघत होते कारण तो कोणत्याही बाजूने अपंग दिसत नव्हता. जमील चा पुन्हा त्या म्हाताऱ्याला पाय लागतो. म्हातारा मात्र आता त्याला एक शिवी हासडतो. समोरून एक आवाज येतो” सगळ्यांची आय डि कार्ड चेक करा.

ज्यांच्याकडे नसेल त्याला फेकून दया. मायला या डब्ब्यात हिंमत कशी काय होते चढायची ” एक दोघे त्याला सापडतात. एका शांतते नंतर कोणीतरी कोणाला मारल्याचा आवाज येतो. आता जमील ला मात्र भीती वाटू लागते यांनी काही केला तर. एक दोघं जण जागा काढत काढत पुढे पुढे येतं राहतात. आयडी कार्ड शोधणारे सुद्धा अपंग होते. एकाच डोळा गेला होता पण दुसऱ्याचा पाय. ते दोघं समोरच्या माणसांना ढकलत ढकलत पुढे येतं असताना समोरचा एक माणूस जमील च्या अंगावर पडतो. म्हातारा आतां इतका वैतागतो जमीलची आय माय काढतो. आणि चेक करणाऱ्या लोकांना याचं आयडी चेक करायला सांगतो. समोरूम चेक करणारे जमील ची कॉलर धरतात आणि त्याला नाव विचारतात. जमील नाव सांगतो नाव सांगितल्यावर मात्र म्हाताऱ्याचा आणि त्या दोघांचा पारा भयंकर चढतो. जमील ला ओढत ओढत गर्दीतून खेचत दरवाज्यापाशी घेऊन येतात. जमील त्यांची माफी मागत राहतो आणि सांगत राहतो कि. माझा आज इंटरव्युव्ह आहे मला सॊडा. परत नाही करणार असं. पण त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचेनासा झाला होता. गर्दीतून खेचताना त्याला ते दोन लोकं मारत होते. त्याला कळेना काय होतआहे. आजूबाजूचे लोकं बोलत होते” मारा… मारा

त्याशिवाय यांना अक्कल येणार नाही “. लोकं आधी पकडलेल्या दोन तिनं जणांना मारत होतेच आणि आता जमील. जमील ला दरवाज्या पाशी घेऊन येतात. त्याला मारतात. पुढच्या स्टेशन ला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाका आवाज बरेच लोकं म्हणत असतात. जमील ची या धावपळीत बॅग कुठं पडलेली असते ती त्याला कळतं नाही. त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं. गाडी हळूहळू स्लो होते. जमील पुढचा मागचा कोणताही नं विचार करता उतरण्याच्या प्रयत्न करतो पण त्याला कोणी उतरू देत नाही. गाडी थोडा वेग पकडते. आणि त्या माणसाने जमील चा पकडलेला शर्ट जाणून बुजून सोडतो. जमील तोल जाऊन ट्रेन मधून पडतो. आता मात्र त्या दोन माणसांची तारांबळ उडते. पण ते बनाव करतात कि त्याने स्वतःहून उडी मारली.

काही महिन्यानंतर. जमील पुन्हा एका गर्दीच्या मागे उभा राहतो . पण त्याच्या हातात आता कुबडी होती तो हँडीकॅप डब्ब्यात घुसतो. त्याचा एक पाय गेलाय कपडे मळके झालेले होते, आणि सीट वर जाऊन बसतो. तर तोच म्हातारा त्याला समोर बसलेला दिसतो. तो म्हातारा त्याच्याकडे बघत बसतो. जमील आता मात्र सहनशीलतेच्या पलीकडे जाऊन त्या म्हाताऱ्याला बोलतो.” आता पाय लागणार नाही, कार्ड आहे “. म्हातारा त्याच्या पायाकडे बघत बसतो. जमील मात्र आतमध्ये उध्वस्त होऊन त्या किरकिरीत बेफिकीर होऊन बसून राहतो.

Check Also

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *