Breaking News

मविआला रोखण्यासाठी भाजपा ठरविणार या मुद्यांवर रणनीती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार असून भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांबाबत बैठकीत पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी दिली.

केशव उपाध्ये म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या एक दिवसाच्या कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस मा. सी. टी. रवी करणार आहेत.

कार्यकारिणी बैठकीत तीन ठराव मांडण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एक ठराव असेल. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि त्याला राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे समर्थन याविषयी एक ठराव असेल. महाविकास आघाडी सरकारकडून समाजाच्या सर्वच घटकांची फसवणूक झाली असून त्याची चर्चा राजकीय ठरावात करण्यात येईल. राज्यातील विरोधी पक्ष म्हणून भाजपा प्रभावी कामगिरी करत आहे. पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा मान्यवरांच्या मार्गदर्शनातून आणि ठरावांद्वारे स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे उपस्थित राहणार आहेत. कार्यकारिणी बैठकीस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष हे मुंबईत उपस्थित राहतील. तसेच विविध जिल्हास्थानी पक्षाचे पदाधिकारी ऑनलाईन पद्धतीने कार्यकारिणी बैठकीत सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

अतुल लोंढे यांची मागणी,… एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा

लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *