Breaking News

मुंबईतील बेकायदेशीर इमारतींवर तीन महिन्यात कारवाई मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहरात ज्या इमारतींचे मनपाच्या कागदोपत्री अस्तित्वच नाही अशा बेकायदेशीर इमारतींची तपासणी करुन कारवाई करावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आणि विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत आज केली.

या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील अनधिकृत इमारतींची यादी जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेला सांगून तीन महिन्यात त्या त्या भागातील वार्ड ऑफिसरला सांगून अशा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे आश्वासन दिले.

मुंबईतील बेकायदेशीर इमारतींची यादी मी दिली असून महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरना अशा इमारती शोधून काढण्याचे काम दयावे आणि अशा बेकायदेशीर इमारती तपासून कारवाई करावी अशी सूचना जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

Check Also

देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंचे एक चांगले काम दाखवा

उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, अशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *