Breaking News

मुंबई शहर, उपनगर तसेच ठाण्यात एसआरएसाठी सीईओ नेमणार गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई आणि उपनगरातील एसआरएच्या योजनांना अधिक गती देण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील एसआरए योजनांची वाढती व्याप्ती लक्षात घेता या तिन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ची नेमणुक करण्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधान परिषदेत दिले.

विधानसभा परिषद नियम २६० अन्वये विविध सदस्यांनी मुंबईतील विविध प्रश्‍नांबाबत आपले विचार मांडले. या प्रस्तावावर परिषदेतील सदस्य प्रसाद लाड, भाई गिरकर, प्रविण दरेकर, गोपीकिशन बजोरिया, प्रा.अनिल सोले, रविंद्र फाटक, सुजितसिंह ठाकुर, गिरीशचंद्र व्यास, विद्या चव्हाण यांनी आपली मते मांडली.

एसआरच्या योजनांना गतीमान करण्यासाठी शासनाने या अधिवेशनातच एकच विधेयक मंजुर केले असून ते माननिय राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. या विधेयकात एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना विशेष अधिकार देण्यात आल्याची माहितीही राज्यमंत्री वायकर यांनी यावेळी दिली.

विविध कारणांमुळे एसआरएच्या योजनांना म्हणावी तशी गती देणे शक्य होत नाही. एसआरए योजना राबविताना विविध प्रश्न निर्माण होतात. सद्यास्थितीत एसआरएला एकच मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याने नियोजित वेळी या समस्यांचे निवारण करणे शक्य होत नाही. ज्याप्रमाणे मुंबई शहर तसेच उपनगरांसाठी स्वतंत्र जिल्हाधिकारी कार्यालय आहे. त्याप्रमाणे मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची नेमणुक केल्यास येथील योजनांना गती देणे शक्य होणार आहे. एवढेच नव्हे तर भविष्यात ठाणे जिल्ह्यात क्लस्टर येाजनेच्या माध्यमातून येणार्‍या एसआरए योजनांना गती देण्यासाठी ठाण्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची नेमणुक करण्याबाबत शासन सकारात्मक असून याप्रश्‍नी लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *