Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेव्हण्यावर ईडीचा कारवाई, या गुन्ह्याखाली केली मालमत्ता जप्त ईडी म्हणते ६ कोटींची मालमत्ता जप्तः २०१७ साली झालेल्या गुन्हेप्रकरणी कारवाई

राज्यातील भाजपा आणि महाविकास आघाडीतील संबध भलतेच ताणले गेल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावून चौकशी केल्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे तथा रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकत ६ सदनिका जप्त करण्यात आले. या अकरा सदनिकांची किंमत ६ कोटी ४५ लाख रूपये असल्याची माहिती ईडीने ट्विट करत दिली. विशेष म्हणजे २०१७ साली पुष्पक ग्रुपशी संबधित २० कोटी रूपयांच्या व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरील कारवाईवेळी ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिकांचा समावेश आहे. या कारवाईनंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करत म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई केली. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला असून त्यासंदर्भात ईडीने मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. घोटाळेबाजांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी ट्विटमधून दिला.

नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एक एंट्री ऑपरेटर असून त्याच्या माध्यमातून ३० कोटींचे कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड यांना शेल कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केले गेले. त्याच पैशातून या ११ सदनिकांची खरेदी केली गेली, असे सांगितले जात आहे. तसेच, भविष्यात श्रीधर पाटणकर यांची देखील ईडीच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, यासंदर्भात ईडीकडून माहिती देण्यात आली आहे. ईडीकडून आज पुष्पक ग्रुपची एक कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिडेटनं खरेदी केलेल्या ११ सदनिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे.

आधी ईडीनं पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात ६ मार्च २०१७ रोजी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, याआधीच ग्रुपच्या मालकीची २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करम्यात आली होती.

पुष्पक ग्रुपशी संबंधित महेश पटेल यांनी पुष्पक ग्रुपशी संबंधित २०.०२ कोटींचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपन्यांकडे ट्रान्सफर केला. त्यांनी पुढे एकूण ३० कोटींचा निधी त्यांची अजून एक शेल कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून असुरक्षित कर्ज स्वरूपात श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिडेटकडे ट्रान्सफर केला. त्यामुळे महेश पटेल यांच्याकडून आलेला निधी साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून रीअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आला.

Check Also

आता काँग्रेसचे राज्य सरकारच्या विरोधात ‘चिपकू’ आंदोलन आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणार

मेट्रो-३ च्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडचा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी …

Leave a Reply

Your email address will not be published.