Breaking News

मोठी दुर्घटनाः रात्रीत इर्शाळवाडीतील ४० घरांवर दरड कोसळली दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी

मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे आणि रेल्वे महामार्ग, रस्ते पाण्याखाली गेल्याचे घटना उघडकीस येत आहे. त्यातच माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ कर्जत तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशी घटना घडली. इर्शाळवाडी येथे आदीवासी ठाकर समाजाची वस्ती असून यातील ४० घरांवर ही दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी आणि जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे.

रायगडमधील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी ही मोठी दुर्घटना घडली. रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत १० ते १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे उपस्थित झाली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही घटनास्थळी पोहोचले आहेत. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर २१ जणांवर नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. वाचवण्यात आलेल्या २५ जणांपैकी ६ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
घटनास्थळ हे दुर्गम भागात असल्याने आणि पावसामुळे बचावकार्यात काहिसे अडथळे येत आहेत. हवामानाची स्थिती लक्षात घेऊन येथे हेलिकॉप्टर द्वारेही बचावकार्य केलं जाणार आहे. तसेच अद्याप या ठिकाणी अजूनही दरड खाली येण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे मदत कार्य करताना अत्यंत काळजीपूर्वक करावं लागत आहे.

घटनास्थळाच्या परिसरात गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. अतिशय भीषण आणि मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत बचावकार्य सुरू झालेलं नव्हतं. अधून मधून जोरदार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत मदत आणि बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

येथील एका आदिवासी पाड्यावर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या वाडीतील ९० टक्के घरे ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे.

आता पुन्हा भूस्खलन होत असून अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत.

दुर्घटना झाल्यानंतर काही लोक घाबरून जंगलात पळाले आहेत. ते परतल्यानंतरच वाडीतील नक्की किती जण या दरडीखाली अडकलेले असू शकतात, याबाबतची नेमकी माहिती मिळेल, असं आपत्कालीन बचाव पथकाच्या एका सदस्याने सांगितलं आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल झाले आहेत. पहाटेच मंत्री दादाजी भुसे यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. मात्र सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे त्यांना वरपर्यंत जाता आलं नाही. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *