Breaking News

Tag Archives: गिरीष महाजन

एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित

पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची दखल घेऊन प्रतिष्ठित स्कोच (SKOCH)च्या रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे हा पुरस्कार सोहळा झाला. ‘एमटीडीसी’च्या अधिकारी मानसी कोठारे यांनी हा पुरस्कार …

Read More »

वांद्र्यांत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन, ५१३ स्टॉलचा समावेश

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करीत ८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश …

Read More »

राज्यात वर्षभरानंतर कॅन्सरग्रस्तांची संख्या १.२५ वर पोहोचणार

मुंबई येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेसचे आयोजन करण्यात आले, राज्याचे ग्राविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर देशतील कॅन्सर विशेषज्ञ, नामवंत चिकीत्सक यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. रमन देशपांडे, डॉ. संजय शर्मा, डॉ. देवेंद्र चौकर, डॉ. संदिप गुप्ता, डॉ. धर्मेश शहा, अमेरिकेतील …

Read More »

मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री महाजन …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा, आरक्षण मिळेल नाही तर अंत्ययात्रा निघेल… सरकारला दिली चार दिवसाची मुदत

जालना येथील आंतरवली सराटा गावात मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण आंदोलनास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची महायुती सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं दिसून आलं तर चार दिवसात मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन या असे शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. सरकारच्या शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री …

Read More »

दुबई फेस्टीवलच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापणार फाऊंडेशन-पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची माहिती

शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर ‍२० ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंचायती राज संस्थांना सक्षम करून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत दिशादर्शक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान …

Read More »

मोठी दुर्घटनाः रात्रीत इर्शाळवाडीतील ४० घरांवर दरड कोसळली दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी

मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे आणि रेल्वे महामार्ग, रस्ते पाण्याखाली गेल्याचे घटना उघडकीस येत आहे. त्यातच माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ कर्जत तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशी घटना घडली. इर्शाळवाडी येथे आदीवासी ठाकर समाजाची वस्ती असून यातील ४० …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक तक्रार “हा” टोल फ्री नंबर डायल करा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती

सध्याची बदलती जीवनशैली, शिक्षण आणि अभ्यासक्रमाची भीती, पालकांचा दबाव तसेच वाढती स्पर्धा यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण- तणाव वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. राज्यातील सर्व शासकिय व अभिमत वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये …

Read More »

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्राची मान्यता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती

परभणी येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या ४३० रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश सुरू होणार आहे. राज्यातील हे २५ वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य आणि क्रीडा व …

Read More »