Breaking News

आर्यन खान अटकेनंतर समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषण… समीर वानखेडे यांने मुंबई उच्च न्यायालयात केले दाखल

सीबीआयने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर वानखेडेंवर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा आणि अंतरिम संरक्षण मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. यात शाहरूख खान आणि समीर वानखेडे यांच्या झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचाही समावेश आहे.

आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरूख खानने समीर वानखेडेंना केलेल्या टेक्स्ट आणि व्हॉट्सअॅप मेसेजचे स्क्रिनशॉट याचिकेबरोबर जोडण्यात आले आहेत. यानुसार शाहरूखने आर्यनच्या सुटकेसाठी समीर वानखेडेंकडे आर्यन खानला सोडण्यासाठी भीक मागतो, असं म्हटलं होतं.

शाहरूख खान समीर वानखेडेंना म्हणाला, कृपया मला कॉल कर. मी आर्यन खानचा वडील म्हणून तुझ्याशी बोलेन. तू चांगला माणूस आहे, एक चांगला पतीदेखील आहेस आणि मी देखील.

कायद्यात राहून माझ्या कुटुंबासाठी मी तुझ्याकडे मदत मागत आहे. मी तुझ्याकडे भीक मागतो. माझ्या मुलाला तुरुंगात जाऊ देऊ नको. तुरुंगात गेल्यामुळे माणूस खचून जातो. तू मला वचन दिलं आहेस की, माझ्या मुलाला बदलून टाकशील. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दया कर. माझ्या मुलाला घरी पाठव. मी तुझ्याकडे एक वडील म्हणून भीक मागतो, असं शाहरूखने म्हटलं.

यावर चॅटमध्ये समीर वानखेडे म्हणतात, शाहरूख खान मी तुला चांगला माणूस म्हणून ओळखतो. जे होईल ते चांगलं होईल. तू तुझी काळजी घे.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *