Breaking News

आझाद मैदानात वर्षभरात ६३८ आंदोलनात अडीच लाख आंदोलनकर्ते सहभागी दरदिवशी होतात सरासरी २ आंदोलने तर ७०४ आंदोलक असतात

मुंबई: प्रतिनिधी

सरकारी दरबारी विविध मागण्यांची तड लावण्यासाठी मुंबईतील सीएसएमटी येथील आझाद मैदानावर राज्यातील तमाम सामाजिक संघटना, राजकिय पक्ष आंदोलनासाठी जमा होतात. या मैदानावर मागील वर्षी अर्थात २०१८ साली राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटन, ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाजाबरोबर व्यापारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, उपोषण आणि आंदोलन केले. या संपूर्ण वर्षभरात एकूण ६३८ आंदोलनात २.५८ लाख लोकांनी भाग घेतल्याची माहिती पोलिसांनी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली असून मैदानात दरदिवशी सरासरी २ आंदोलने होतात तर ७०४ आंदोलक उपस्थित असतात.

वर्ष २०१८ या वर्षात आझाद मैदानात झालेल्या विविध प्रकाराचे आंदोलन आणि त्यात भाग घेतलेल्या लोकांची संख्या किती होती. आझाद मैदान पोलिसांनी अनिल गलगली वर्ष २०१८ या वर्षी आझाद मैदानात झालेल्या आंदोलनाची संख्यात्मक आकडेवारी उपलब्ध करून दिली असून वर्ष २०१८ या एकूण १२ महिन्यात ६३८ आंदोलने झाली. यात २ लाख ५७ हजार २२० लोकांनी भाग घेतला. सर्वाधिक आंदोलन सामाजिक संघटना तर्फे करण्यात आली. एकूण ३०१ आंदोलन पोलिसांच्या अभिलेखावर नोंदणीकृत आहेत. ज्यात ४० हजार १०१ लोकांनी भाग घेतला. सर्वाधिक गर्दी ही अन्य संघटन आणि व्यापारी संघटनाची होती. एकूण १६७ आंदोलनात ८७ हजार ७४६ लोक सहभागी झाले होते. कामगार संघटनातर्फे आयोजित ६८ आंदोलनात ३९ हजार ५३२ लोकांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थी संघटनाच्या ९ आंदोलनात १३९२ लोक उपस्थित होते. मुस्लिम संघटनेतर्फे ९ वेळा केलेल्या आंदोलनात २६ हजार १५१ लोक सहभागी झाले होते. ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाजातर्फे ४४ आंदोलनात ३६ हजार ५५२ लोक एकत्रित आले होते.

भाजपा, राष्ट्रवादी, कांग्रेस, बसपा आणि आरपीआय या राजकीय पक्षाने फक्त २९ आंदोलन आझाद मैदानावर करण्यात आले होते यात एकंदरीत २५ हजार ७४६ लोकांनी भाग घेतला होता. भाजपाने फक्त ५ वेळाच आंदोलन केले होते. पण १८ हजार ३३० इतकी गर्दी जमा केली होती. आरपीआय तर्फे सर्वाधिक १८ आंदोलन करण्यात आले होते. ज्यात ९९ लोकांनी भाग घेतला होता. कांग्रेसच्या १२ आंदोलनात १६४२ लोक उपस्थित राहिले होते. राष्ट्रवादी पक्षाने फक्त एकदाच आंदोलन केले होते. ज्यात ३५०० लोक उपस्थित होते. बसपाने केलेल्या ३ आंदोलनात १२७५ लोक आझाद मैदानात जमा झाले होते. शिवसेना पक्षाने एकदाही कोणत्याही प्रकारचे आंदोलन केले नाही.

Check Also

अखेर उत्तर पश्चिम मुंबईतून रविंद्र वायकर यांची शिंदे गटाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून अखेर खरी शिवसेना आणि नकली शिवसेना असा वाद भाजपाच्या नेत्यांनी राज्यात सुरु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *