Breaking News

राष्ट्रीय अध्यक्षांचा स्वबळाचा नारा तर प्रदेशाध्यक्ष पाटलांचे सेनेबरोबर युतीचे वक्तव्य २४ तासातच भाजपाच्या युटर्नने राजकीय वर्तुळात खळबळ !

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांना स्वबळाचा संदेश देवून २४ तास झाले नाहीत, तोच प्रदेश भाजपमध्ये  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सरकार बनविण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांना थोपवून धरण्यासाठी पाटील यांना असे बोलावे लागत असेल अशी प्रतिक्रिया याभात भाजप पदाधिकारीच आपसात देत आहेत! त्यामुळे राज्यातील भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील डॅमेज कंट्रोलसाठी हा मार्ग अबलंबिताना दिसत आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावाचे वक्तव्य करत आयारामांना थोपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले.

राजकीय विश्लेषकांच्या मते महाविकास आघाडीत सध्या सुरू असलेल्या संभ्रमाच्या वातावरणात भर घालण्यासाठी देखील हा खटाटोप भाजप नेते करत असावेत. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांचा भूमिकेला २४तास होत नाहीत तोच खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये ‘कुछ तो है दया’ अशी शंका घेतली जात आहे. राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार आहोत, असे वक्तव्य  चंद्रकांत पाटील यांनी केल्याने जे पी नड्डा यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याच्या सूचनेला छेद गेल्याचे भाजपमधील नेते खाजगीत मान्य करत असले तरी उघडपणे यावर कुणी प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.

मात्र चंद्रकांत पाटील यांनीच असे वक्तव्य केल्याने अन्य पक्षातून भाजपात आलेले नेते आश्चर्य व्यक्त करत आहेत. राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार आहोत. मात्र शिवसेना आणि भाजप एकत्र आले तरी निवडणूक मात्र वेगवेगळे लढू, असे त्यांनी म्हटले. या वक्तव्याच्या वेळ आणि संदर्भा बाबत मात्र खुलासा करता येत नसल्याचे भाजपातील काही नेत्यांनी स्पष्ट केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *