Breaking News

अखेर जनभावनेचा आदर करत महेश मांजरेकरांनी घेतली माघार, “ती दृष्ये वगळणार” नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्यांना कात्री

मराठी ई-बातम्या टीम

मराठी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या आगामी मराठी “नाय वरणभात लोन्चा कोण नाही कोन्चा” चित्रपटात मराठी महिलांचे विकृत दर्शन दाखविणारी आणि लहान मुलांबद्दलची असलेली आक्षेपार्ह दृश्ये प्रोमोबरोबरच चित्रपटातून वगळण्यात येत असल्याचे आज एक प्रसिध्दी पत्रक काढत जाहीर केले. याविषयीचे सर्वात आधी वृत्त मराठी ई-बातम्या.कॉम (www.marathiebatmya.com) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर इतर माध्यमांतून यासंबधीचे वृत्त प्रकाशित करण्यात आले.

मांजरेकर यांच्या या मराठी चित्रपठाचा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर सर्वचस्तरातून प्रोमोत दाखविण्यात आलेल्या अनेक आक्षेपार्ह दृश्यांबद्दल नेटकऱ्यांनी आणि गिरणी कामगारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने आणि राज्य महिला आयोगाने चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना नोटीस बजावत याप्रश्नी खुलासा मागत ती अश्लिल आणि आक्षेपार्ह दृष्ये वगळण्याबाबत आदेश दिले होते.

हे ही वाचा:-

https://www.marathiebatmya.com/films/marathi-actor-director-mahesh-manjrekar-new-marathi-movie-come-in-again-controversy-mill-workers-got-angry-on-movie-promo/

त्यामुळे अखेर महेश मांजरेकर यांनी तो प्रोमो आणि चित्रपटातील दृष्ये वगळण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच या दृष्याच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखाविण्याचा हेतू नाही. या ज्येष्ठ पत्रकार आणि नाट्यलेखक, कथाकारक स्व.जयंत पवार यांच्या कथेवर हा चित्रपट आधारीत असून हा चित्रपट १८ वर्षावरील व्यक्तींसाठीच तयार करण्यात आला आहे. तसेच ए हे प्रमाणपत्रही सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

या चित्रपटाच्या माध्यमातून त्या काळी ज्या काही घटना घडल्या त्या घटनांचा संदर्भ देत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना या घटनांमधील दाहकता सहन करू शकतात दृष्यातील गांभीर्यता पाहू शकतात त्यांनीच हा सिनेमा पहावा असे आवाहनही त्यांनी केले.

महेश मांजरेकर यांनी जाहीर केलेले हेच ते प्रसिध्दी पत्रक-:

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *