Breaking News

Video: महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटात गिरणी कामगारांच्या चित्रणावरून संताप गिरणी कामगारांकडून तीव्र नाराजी

मराठी ई-बातम्या टीम

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर हे मागील काही महिन्यापासून सातत्याने वादाच्या मध्यवर्ती ठिकाणी रहात असून काही दिवसांपूर्वी त्यांनी गोडसे चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून एक नवा वाद निर्माण केला. आता त्यानंतर लालबाग परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारीत “नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा” या आगामी मराठी चित्रपटाचा प्रोमो रिलीज केला आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये मराठी माणसांचे विकृत पध्दतीने चित्रण केल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांबरोबरच नेटकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चीड व्यक्त करण्यात येत आहे.

हा चित्रपट १४ जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा प्रोमो रिलीज करण्यात आला. त्यानंतर या चित्रपटाच्या प्रोमोचा व्हिडिओ मराठीमध्ये वेगाने व्हायरल झाला असून या चित्रपटातील मराठी माणसांच्या गिरणी कामगारांच्या विकृत चित्रणाबद्दल महेश मांजरेकर यांना त्यांच्या व्हाट्सअॅपवर या संदर्भात संताप व्यक्त करणारे मेसेजेस करण्यात येत आहेत.

या प्रोमोवर गिरणी कामगारांच्या संघटनांनीही संताप व्यक्त केला असून यासंदर्भात महेश मांजरेकर यांच्याबरोबर राज्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे गिरणी कामगारांच्या संघटनांकडून सांगण्यात येत आहे.

या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये घरातील नातेवाईकांच्यामध्येच अनैतिक संबध, लहान मुलांबरोबर लैगिंक चाळे, मुलांचे गुन्हेगारीकरण आदी गोष्टी दाखविण्यात आल्या असल्याचे प्रोमोवरून दिसून येत आहे. तसेच गिरणी कामगारांच्या महिलांबाबत विकृत चित्रणही दाखविण्यात आले आहे.  या चित्रणावरूनच लालबाग परळ वासियांकडून संताप आणि चीड व्यक्त करण्यात येत आहे.

विकृत चित्रिकरणाबद्दल मांजरेकरांना पाठविण्यात आलेला मेसेज:-

Check Also

श्रद्धा कपूरने खरेदी केली ही महागडी गाडी , किंमत ऐकून बसेल धक्का श्रद्धाने खरेदी केली इतक्या कोटीची महागडी गाडी; होतोय शुभेच्छाच वर्षाव

अभिनेत्री श्रद्धा कपूरचे जगभरात लाखो चाहते आहेत. इतर अभिनेत्रींपेक्षा ती नेहमीच वेगळी असते आणि तिचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *