Breaking News

लंबूजी-टिंगूजींनी घेतली कठोर मेहनत सात तास मेकअप, सहा तास शूट

मुंबई : प्रतिनिधी

लंबूजी-टिंगूजी हे दोन शब्द आठवताच आजही आपल्या डोळ्यांसमोर अनाहुतपणे अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचे चेहरे येतात. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मनमोहन देसाईंच्या ‘कुली’ या सिनेमातील ‘लंबूजी लंबूजी, बोलो भाई टिंगूजी…’ या गाण्याने त्या काळात लोकप्रियतेचा एक अनोखा इतिहासच रचला होता. या गाण्यात अमिताभना लंबूजी म्हणून तर ऋषी यांना टिंगूजी म्हणून संबोधण्यात आलं होतं. हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय ठरलेली लंबू-टिंगू यांची ही जोडी ‘१०२ नॅाट आऊट’ या हिंदी सिनेमात तब्बल २७ वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी दोघांनीही सात तासांचा मेकअप केला आहे.

‘१०२ नॅाट आऊट’ हा सिनेमा बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे. अमिताभ-ऋषी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्यामुळे हा सिनेमा चर्चेत आला आहेच, पण त्याहीपेक्षा या सिनेमातील दोघांचाही मेकअप लक्ष वेधून घेणारा आहे. या सिनेमात दोघांनीही आपल्या वयापेक्षा जास्त वयस्कर व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या सिनेमात अमिताभ यांनी ऋषीच्या वडीलांची भूमिका साकारली आहे. ऋषी यांचं या सिनेमातील वय ७० असून अमिताभ यांचं वय त्याहीपेक्षा जास्त आहे. दिग्दर्शक उमेश शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार दोघांनीही आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. दोघांनाही दररोज मेकअपसाठी सात तास लागायचे. दोघेही रोज एका अनोख्या एनर्जीसह पहाटे पाच वाजता सेटवर हजर व्हायचे. लंचपर्यंत दोघांचाही मेकअप पूर्ण झाल्यावर शूटिंगला सुरुवात व्हायची. सायंकाळी सहा पर्यंत शूट असायचं, पण कधी कधी रात्री नऊसुद्धा वाजायचे. प्रोस्थेटिक्स मेकअपच्या सहाय्याने दोघांना आपल्या वयापेक्षा जास्त वयस्कर दाखवण्यात आलं आहे. अशा प्रकारच्या मेकअपमध्ये १२ ते १६ तास वावरणं ही सोपं नसून खूप त्रासदायक असल्याचं शुक्ला म्हणतात.

तसं पाहिलं प्रोस्थेटिक्स मेकअपसाठी तासन तास बसणं ही गोष्ट अमिताभ यांच्यासाठी नवीन नाही. यापूर्वी काही सिनेमांसाठी त्यांनी अशा प्रकारची मेहनत घेतली आहे. असं असलं तरी वयाच्या या टप्प्यावर इतकी मेहनत घेणं ही सर्वसामान्य बाब नाही. यासाठी ऋषी यांचंही कौतुक करावंच लागेल. दोघांनाही करण्यात आलेल्या असामान्य मेकअपमुळे ‘१०२ नॅाट आऊट’बाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, पण हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना  ४ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *