Breaking News

प्रवीण भोटकर यांना “डॉ.आंबेडकररत्न पुरस्कार” जाहीर इकॉनॉमिक्स अँड सोशल अफेअर्स आणि फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉनचा पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे संथापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोटकर यांना अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र संघाच्या इकॉनॉमिक्स अँड सोशल अफेअर्स आणि फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन”डॉ.आंबेडकर रत्न ग्लोबल चेंजमेकर्स अवॉर्ड”हा अतिशय मानाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनी जगभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२७ मान्यवरांचा सत्कार समारंभ संयुक्त राष्ट्र संघाच्या इकॉनॉमिक्स अँड सोशल अफेअर्स विभाग तसेच फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात आयोजित केला आहे.

भोटकर हे मु.पो.पारस ता.बाळापूर जिल्हा अकोला येथील असून गेल्या १४ वर्षांपासून पत्रकार आणि भारिप बहुजन महासंघाच्या मंत्रालयीन सचिव अश्या विविध पदावर उत्कृष्ठ कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. रुग्णसेवा, कामगार, परदेशी शिष्यवृत्ती, मागासवर्गीय उद्योजक निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर लढा, व्यसनमुक्ती,आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यासाठी दिलेला यशस्वी लढा, संविधान एक्सप्रेस सुरू करण्यासाठीचे अथक प्रयत्न, संविधान दिनी संविधान दौडचे यशस्वी आयोजन, लंडन येथील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले घर खरेदी करण्यासाठीचे प्रयत्न, पारस औष्णिक विद्युत प्रकल्पातील कंत्राटी कामगारांच्या हितासाठी चा लढा, बाळापूर मतदारसंघातील रस्त्याच्या सुधारणेसाठीचे प्रयत्न, शिक्षक परिषदांचे आयोजन, लाड- पागे समितीच्या शिफारसी नुसार सफाई कामगारांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न, विविध आरोग्य शिबिराचे आयोजन, विद्यार्थ्यांसाठी अभिनव विमान प्रवास, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून प्रवीण भोटकर यांची निवड करण्यात आली आहे.

जगभरातील देशाचे मुख्यालय असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अर्थशास्त्र आणि सामाजिक न्याय विभागाने प्रवीण भोटकर यांच्या उत्तुंग कार्याची दखल घेणे अत्यंत कौतुकास्पद असून महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह आहे,या आधी महाराष्ट्र शासनाने सुद्धा प्रवीण भोटकर याना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. प्रवीण भोटकर यांच्या निवडीने सच्चा कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात येत असल्याची भावना जनमानसात चर्चिल्या जात आहे.सदर पुरस्काराच्या वितरण सोहळ्यास अमेरिका आणि इतरही देशातील प्रतिनिधी, अमेरिकेतील भारतीय दुतावासाचे राजदूत आणि उच्च पदस्थ अधिकारी तसेच फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन या सुप्रसिद्ध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दिलीपजी म्हस्के इत्यादी मान्यवर उपस्थितीत राहणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातील सेंट्रल हॉल मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य दिव्य कार्यक्रम होणार असून त्या कार्यक्रमास प्रवीण भोटकर यांना आमंत्रित करण्यात आले असून या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदानही करण्यात येणार आहे.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *