Breaking News

दोन वर्षांनी पुन्हा एकत्र येणार सुबोध-श्रुती समीर सुर्वेंच्या दिग्दर्शनाखालील चित्रपटात दिसणार

मुंबई : प्रतिनिधी

खासगी जीवनातील जोड्या एकदाच बनतात, पण चंदेरी दुनियेत तसं नाही. चंदेरी दुनियेतही काही जोड्या एकदा बनतात आणि पुन्हा कधीच एकत्र दिसत नाहीत, पण काही जोड्या मात्र याला अपवाद ठरतात. रसिकांची पावती मिळाल्याने काही जोड्या पुन: पुन्हा रुपेरी पडद्यावर येतात. हिंदीपासून मराठी सिनेसृष्टीपर्यंत आजवर बऱ्याच कलाकारांनी जोड्यांच्या रूपात प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. यात आता आणखी एका जोडीची भर पडली आहे. ही जोडी आहे सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची…

सुबोध आणि श्रुतीची जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर येत नाहीय. यापूर्वी ‘बंध नायलॅानचे’ या सिनेमात सर्वप्रथम ही जोडी एकत्र आली होती. आता दोन वर्षांनंतर सुबोध आणि श्रुती पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचं शीर्षक अद्याप निश्चित झालं नसलं तरी एका आगामी सिनेमात ही जोडी एकत्र येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी आपल्या आगामी मराठी सिनेमासाठी सुबोध आणि श्रुती यांच्याशी संपर्क साधला असल्याचं समजतं. समीर या सिनेमाची निर्मिती फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन्स या बॅनरखाली करणार आहे. सुबोध आणि श्रुतीबाबत त्यांचं नेमकं कोणत्या गोष्टीवर बोलणं झालंय ते अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ‘बंध नायलॅानचे’ या सिनेमानंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सुबोध आणि श्रुती यांची पहिल्या सिनेमापासूनच खूप छान केमिस्ट्री जुळली आहे. त्यामुळे दुसऱ्या सिनेमाच्या निमित्ताने ही केमिस्ट्री आणखी खुलेल असा अंदाज सूत्रांकडून वर्तवला जात आहे. या सिनेमात सुबोध आणि श्रुती यांच्यासोबत इतर कोणकोणते कलाकार दिसणार आहेत त्याबाबत सध्या तरी काहीही सांगण्यात येत नाही. लवकरच इतर कलाकार आणि तंत्रज्ञांच्या नावांची घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या सिनेमाच्या इतर बाबींवर वेगात काम सुरू असल्याचं समजतं.

 

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *