Breaking News

लसच नाही तर मेडिकल इक्वीपमेंट देण्यातही मोदी सरकारचा महाराष्ट्रावर अन्याय काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी

केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राला कमी लस पुरवठ्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कोरोनाच्या लढाईसाठी लागणाऱ्या मेडिकल इक्वीपमेंट देण्यातही केंद्राकडून अन्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला दिलेल्या इक्वीपमेंटची माहिती केंद्र सरकारनेच संसदेत दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकान्वये केला.

कोरोना विरूध्दच्या लढाईसाठी केंद्र सरकारकडून देशातील सर्व राज्यांना एन९५ मास्क, पीपीई किट आणि व्हेटींलेटर वाटप करण्यात आले. परंतु देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण बाधित रूग्ण असताना केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक देण्यात येत आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून फक्त लसीचा पुरवठा करण्यातच अन्याय करण्यात येत नाही. तर कोरोनाच्या विरोधातील मेडिकल इक्वीपमेंट देण्यातही अन्याय केल्याची माहिती संसदेच्या लोकसभा सभागृहात १० फेब्रुवारी २०२१ रोजी दस्तुरखुद्द केंद्राने दिली. केंद्राने दिलेल्या माहितीमुळे तर धक्काच बसल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक एन९५ मास्कचे वाटप गुजरातला ९ हजार ६२३ देण्यात आले आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राला फक्त १५६० अवघे एन९५ मास्क देण्यात आले आहेत.  इतकेच नव्हे तर महाराष्ट्रापेक्षा दुप्पट उत्तर प्रदेशला अर्थात ३ हजार ९१६ मास्क देण्यात आले. सर्वाधिक ४ हजार ९५१ पीपीई किटही गुजरातला देण्यात आले. त्यानंतर उत्तर प्रदेशला २ हजार ४४६ इतके देण्यात आले. तर महाराष्ट्राला अवघे २२३ पीपीई किट देण्यात आले. तर एक हजार रूग्णसंख्येच्या मागे गुजरात सर्वाधिक १३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. तर उत्तर प्रदेशला ७ तर महाराष्ट्राला फक्त २ व्हेंटीलेटर देण्यात आले आहेत. तर केरळला महाराष्ट्रापेक्षाही कमी व्हेंटीलेटर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकारला फक्त गुजरात, उत्तर प्रदेश आणि भाजपाशासित राज्य वगळता इतर राज्यांकडे राजकिय पध्दतीने दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. (सोबत मेडिकल इक्वीपमेंट वाटपाचा तक्ता)

Medical Equipments Distributed by Government of India

State Medical Equipment Per 1000 Covid-19 Patients
N95 Mask PPE Kits Ventilators
Gujarat 9623 4951 13
Uttar Pradesh 3916 2446 7
West Bengal 3214 848 2
Tamil Nadu 2213 639 2
Maharashtra 1560 723 2
Kerala 814 192 1

 Source:

  1. Lok Sabha Unstarred Question No. 2019 dated 12 February 2021.
  2. Cumulative Covid-19 case data as on 10 February 2021 – MoHFW.

Check Also

कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने दिला दिलासा पुन्हा होणार JEE-Main ची परिक्षा-शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरड  कोसळण्याच्या घटना घडल्या. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *