Breaking News

लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क वापरा, अन्यथा १० दिवसात लागू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: विशेष प्रतिनिधी

१५ दिवसापूर्वी राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ हजाराच्या दरम्यान असायची. मात्र आज हि संख्या दुपटीने वाढत आहे. त्यास आपला गाफिलपणा कारणीभूत असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा असे वाटत नसेल तर मास्क, सॅनिटायझर आणि शाररीक अंतर पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत पुढील ८ ते १० दिवस नागरीकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे बघुन लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेणार असल्याचा इशारा त्यांनी आज राज्यातील जनतेला दिला.

मागील १५ दिवसात राज्यात कोरोना बाधितांची संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी समाजमाध्यमातून संवाद साधला.

राज्यात आपण जेव्हा आपण पिकला होतो तेव्हा अमरावतीत बाधितांची संख्या कमी होती. मात्र आता त्यावेळच्या पिक संख्ये इतके बाधित अमरावतीत आढळून येत असून एक हजाराच्या प्रमाणात तेथे रूग्ण आढळून येत आहेत. हिच परिस्थिती इतर भागातही निर्माण होत आहे. त्यामुळे आज रात्रीपासूनच अशा भागात लॉकडाऊन जाहिर करा असे मी करणार नाही. मात्र स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिथे आवश्यकता असेल त्या भागात कडक निर्बंध उद्या मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना लस कधी? 

कोरोनाबरोबरच्या युध्दात पूर्वीही आणि आताही आपल्याकडे लस नाही. मात्र लस आलेली आहे. मात्र हि आपल्यासाठी कधी उपलब्ध होणार याचे उत्तर उपरवालेच (पंतप्रधान नरेंद्र मोदी) हेच देवू शकतील. सुदैवाने आणखी दोन-तीन कंपन्यांनी आपल्याकडे कोरोना लसीचे उत्पादन सुरु केले आहे. त्या लसी तयार झाल्यानंतर आपल्याला उपलब्ध होतील आणि लसीकरण मोहिम सुरु होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यपालांना टोला

मागील काही दिवसांपासून काहीजण कोरोना योध्द्यांचे सत्कार करत सोहळे करत आहेत. कोरोना योध्द्यांचा सत्कार झालाच पाहिजेच. मात्र त्यामागे किमान हि भावना त्यांच्यात असायला हवी की आपण कोरोना योध्दे होत नसू तर किमान कोरोना दूत अर्थात कोरोना वाहक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असे सांगत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या कोरोना योध्द्यांच्या सत्कार सोहळ्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

विरोधकांवर टीका

कोरोनाच्या पिक काळात काही जणांकडून हे चालू करा ते चालू करा असे सांगत सगळं बाजूला राहू द्या आधी मंदिर सुरु करा म्हणणारेही आता कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी पुढे येणार नसल्याचे सांगत हे संकट आपल्यालाच थोपवावे लागणार असल्याचे सांगत भाजपाचे नाव घेता त्यांनी टीका केली.

या राजकिय कार्यक्रमांवर बंदी

उद्यापासून आगामी काही काळ सर्वच जाहिर शासकिय कार्यक्रम, राजकिय सभा, मोर्चे, गर्दीची आंदोलने, यात्रा आदी गोष्टींवर बंदी घालण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगत उद्याचा रायगडमधील मर्यादीत नागरीकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्यानंतर मी स्वत: सर्व शासकिय कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्ष वाढविण्याचा अधिकार सर्वच राजकिय पक्षांना आहे. तुम्हाला, महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना आणि मलाही पक्ष वाढवायचा आहे. मात्र आपल्याला पक्ष वाढविण्याच्या नादात कोरोना वाढू द्यायचा नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

“होय, मी जबाबदार” नवी मोहिम

त्याचबरोबर आगामी काळात माझे कुंटुंब माझी जबाबदारी याधर्तीवर आता होय मी जबाबदार हि नवी मोहिम आपण कोरोनाला रोखण्यासाठी राबविणार आहोत. त्यासाठी सर्व कार्यालयांनी २४ तासाचे नियोजन करून कार्यालयाच्या वेळेत बदल करावा शक्यतो पुन्हा
ऑनलाईन कामे करून घ्यावेत तसेच आज एकजण आला तर दुसऱ्या दिवशी दुसरा येईल अशा पध्दतीने कामकाज चालवावे जेणेकरून मुंबईतील लोकल आणि बाहेरची गर्दी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ऊर्जा मंत्री राऊत यांचे खास अभिनंदन

नागपूर आणि मुंबईत वाढत्या कोरोना संख्या वाढीमुळे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या मुलाचा नियोजित लग्न सोहळा रद्द केला असून सामाजिक भान जपल्याबद्दल मुख्यमंत्री उध्द ठाकरे यांनी त्यांचे खास अभिनंदन केले.

राजेश टोपे हे डॉक्टर आहेत

कोरोना लढ्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही सारेच जण त्यांना डॉक्टर म्हणून संबोधत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *