Breaking News

Tag Archives: dr.nitin raut

राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण? उध्दव ठाकरे कि अजित पवार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत की अजित पवार असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित करून खळबळ माजवली. खुद्द राज्य सरकारच्या महावितरण महामंडळाने घरगुती वापराच्या वीजबिलावर ५० टक्के सवलतीचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सादर केलेला प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजितदादा …

Read More »

तीन दिवसांत निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसू आ. भातखळकर यांचे महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम

मुंबई : प्रतिनिधी आपल्या गलथान कारभारामूळे संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बीले अदा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत बीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा अल्टिमेटमच भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. भारतीय जनता …

Read More »

एक लाख कृषीपंप जोडण्या देत ग्रामीण भागातील या संस्थाकडून होणार बिलाची वसुली नवीन धोरण जाहीर- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कृषी ग्राहकांची थकबाकी वसूल करण्याकरिता ग्रामविद्युत व्यवस्थापक, ग्रामपंचायत, शेतकरी सहकारी संस्था, महिला बचत गट यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषीपंपांची पाच वर्षापुर्वीची व पाच वर्षापर्यंतची थकबाकी व्याज व विलंब आकारात सूट देऊन सुधारित करण्यात येणार आहे. सदर  थकबाकीची रक्कम ३ वर्षात भरण्याची मुभा असणार आहे. पहिल्या वर्षी भरलेल्या रकमेवर …

Read More »

वीज बीलप्रश्नी राज भेटले राज्यपालांना, मात्र सल्ला दिला पवारांना भेटण्याचा शरद पवार यांच्या टोल्यानंतर राज्यपालांची सावध पवित्रा

मुंबईः प्रतिनिधी लॉकडाऊन काळापासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना वाढीव वीज बील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. याप्रश्नी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत निवेदन दिले. त्यावर राज्यपालांनी याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच प्रसारमाध्यमांना दिली. …

Read More »

मंत्री राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात दलित सरपंचाच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी गेले असता कारवाई

आझमगड-मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत …

Read More »

अनुसूचित जाती-जमातीच्या शासकिय कर्मचाऱ्यांची माहिती २ दिवसात सादर करा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभागांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना देण्यात येत असलेल्या पदोन्नती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्याची पुढील सुणावनी लवकरच होणार असल्याने सध्या शासकिय विभागात कार्यरत असलेल्या या दोन्ही प्रवर्गासाठीची मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती दोन दिवसात अर्थात २० ऑगस्ट पर्यत सामान्य प्रशासन …

Read More »

मंत्र्यांनी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना परंतु पदोन्नतीप्रश्नी सामाजिक न्याय विभाग गप्प का? महाविकास आघाडीत सुरुवातीला एकमत आता मात्र फक्त बघण्याचा कार्यक्रम

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील अनुसूचित जाती-जमातीसह सर्वच मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र याप्रश्नी राज्य सरकारची बाजू कोण मांडणार यासाठी अद्यापपर्यंत ज्येष्ठ विधिज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या प्रश्नी राज्याचे सामाजिक न्याय विभाग आणि त्या विभागाचे मंत्री धनंजय …

Read More »

वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकारची केंद्राकडे निधीची मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी लॉकडाउनच्या काळात महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली. या काळातील वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत, वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करणार असून लवकरच याबाबतचे पत्र केंद्राला लिहिणार असल्याची माहिती डॉ.नितीन राऊत यांनी दिली. मागील …

Read More »

ऊर्जामंत्री राऊतजी, २ हजार रूपया पर्यतचे वीजबील माफ करा उद्योगांना अंदाजीत बीले पाठविण्याऐवजी योग्य बीले पाठविण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे मुंबईसह राज्यातील सर्वच आर्थिक, व्यवसाय केंद्रे बंद आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना घरी बसावे लागले. त्यातच या नागरिकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळालेच असे नाही. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यातच आता दोन महिन्याची वीज बिले वीज कंपन्यांनी एकमद अंदाजित वाढीव रकमेची जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीज …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू असल्याची ऊर्जामंत्री राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले असून वीजपुरवठा रवंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान …

Read More »