Breaking News

विशेष बातमी

खाते वाटपात भाजपाच्या तुलनेत शिंदे गटाला काय मिळाले आणि आणखी काय मिळणार? महत्वाची खाती वगळता तोफेच्या तोंडी शिंदे गटाचे मंत्री

हिंदूत्वाच्या मुद्यावरून आणि आम्हाला चांगली खाती पाहिजेत असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत जात राज्यात स्थापन केली. उशीराने का होईना राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर या मंत्र्यांना खात्याचे आज वाटपही करण्यात आले. आज झालेल्या खातेवाटपात राज्याच्या दिशाधोरण आणि क्रिमची ओळखली जाणारी महत्वाची खाती …

Read More »

अजित पवार यांच्या ‘त्या’ मागणीने प्रशासनाला प्रश्न, उत्तरांना मान्यता कोण देणार? विधिमंडळाकडून उत्तरे पाठविण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून ३९ दिवस झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. आता मंत्रिमंडळ विस्तार होवून तीन दिवस होत आले तरी अद्याप मंत्र्याना खाते वाटप झालेले नाही. त्यातच १७ तारखेपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरे न घेण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारने आता प्रश्नोत्तरे घेण्याची …

Read More »

राज्यभरातील कारागृहांमध्ये उमटले “जीवनगाणे गातचं जावे”चे सूर… एकाच दिवशी एकाच वेळी ३६ कारागृहात विशेष कार्यक्रमांचे आयोजन

छोट्या मोठ्या चुकांमुळे कैदी बनून आयुष्य जगणाऱ्या बनलेल्या अनेकांसाठी आजचा दिवस विशेष ठरला.. निमित्त होते, “जीवन गाणे गातचं गावे”… या अनोख्या कार्यक्रमाचे… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, राज्यातील ३६ प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आज आयोजन करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला. “जीवन गाणे गातच जावे…” या विशेष कार्यक्रमाचे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहात …

Read More »

“तिरंग्यावरही भाजपाचे नाव” काँग्रेसने फाडला “हर घर तिरंगा” घोषणेचा बुरखा परभणीतील व्हिडिओ जारी करत केली भाजपाने माफी मागावी केली मागणी

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टला हर घर तिरंगा या योजनेची घोषणा केली. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी देशाच्या विविध भागात सर्वसामान्य नागरिकांना झेंडा खरेदी करण्यासाठी कशा पध्दतीची अडवणूक आणि छळवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात तिरंगा झेंड्यावर भाजपाचे नाव …

Read More »

जालन्यात वऱ्हाडी म्हणून आले अन् ३९० कोटींची मालमत्ता जप्त करून गेले आयकर विभागाने महाराष्ट्रात केलेली सर्वात मोठी कारवाई

मागील महिन्यांपासून राज्यातील राजकिय नेत्यांच्या मागे ईडी, आयकर विभागाचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकांकडे फारशी अवैध मालमत्ता असते याची माहितीच पुढे येत नव्हती. मात्र आज आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी जालन्यात वऱ्हाडी असण्याचे सोंग घेत जालन्यातील स्टील कारखानदार, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि कपडे व्यापाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापा टाकला. या छाप्यात …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपासोबत गेले अन् पावन झालेल्यांची संख्या चार संजय राठोड, राधाकृष्ण विखे-पाटील, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाले. मात्र न्यायालयीन लढाईमुळे शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार ३९ दिवस रखलेला होता. हा रखडलेला मंत्रिंडळाचा विस्तार आज अखेर झाला. मात्र या विस्तारात भाजपासोबत गेले अन् पावन झालेल्या मंत्र्यांची लक्षात येण्यासारखी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांचे एका …

Read More »

कपिल सिब्बल म्हणाले, न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही पिपल्स ज्युडीसीयल रोलबॅक ऑफ सिव्हील लिबर्टी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत

ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात गेल्या ५० वर्षांपासून वकीली करत असून, त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्ष प्रकरणात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल शिवसेनेच्या वतीने केस लढत आहेत. राज्यातील सत्ता संघर्षानंतर नविन …

Read More »

कट्टर हिंदूत्ववादी शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरम सणाच्या दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी २०-२५ जणांचा होणार शपथविधी

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या पाठिंब्याने सरकार सत्तेवर आले. हे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील आणि भाजपाकडून हे सरकार हिंदूत्ववादी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या हिंदूत्वावादी सरकारकडून एक महिन्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिंदू सणाच्या किंवा हिंदू शुभ दिवशी होणे अपेक्षित …

Read More »

बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेत दोन भारतीयांचा “गोल्डन पंच” बॉक्सींगमध्ये नीतू घागंस आणि अमित पंघालने मिळविले गोल्ड मेडल

मागील काही दिवसांपासून इंग्लड येथील बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा होत असून या स्पर्धेत आज दोन भारतीय खेळाडूंनी वाखणण्यासारखी कामगिरी करत गोल्डन पंच लगावत बॉक्सींगमध्ये भारताला दोन गोल्डमेडल मिळवून दिले. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी महिलांच्या ४८ किली वजनी गटात नितू घांगसने तर तिच्या पाठोपाठ अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून गोल्ड मेडल …

Read More »

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी सातारच्या रणजीत मोरे यांची नियुक्ती मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रणजित वसंतराव मोरे

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे सुपूत्र आणि मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रणजित वसंतराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड येथील आहेत. त्यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण निमसोड येथे झाले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी …

Read More »