Breaking News

“तिरंग्यावरही भाजपाचे नाव” काँग्रेसने फाडला “हर घर तिरंगा” घोषणेचा बुरखा परभणीतील व्हिडिओ जारी करत केली भाजपाने माफी मागावी केली मागणी

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टला हर घर तिरंगा या योजनेची घोषणा केली. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी देशाच्या विविध भागात सर्वसामान्य नागरिकांना झेंडा खरेदी करण्यासाठी कशा पध्दतीची अडवणूक आणि छळवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात तिरंगा झेंड्यावर भाजपाचे नाव निवडणूक चिन्ह छापून त्याचे वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादाक व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नुकताच ट्विट केला. तसेच या प्रकाराबाबत भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली.

प्रत्येक घरी तिरंगा पोहोचवण्याचं काम स्थानिक प्रशासनासोबतच अनेक स्वयंसेवी संस्था देखील करत आहेत. मात्र, या मोहिमेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या आरोप-प्रत्यारोपांमध्येच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला असून यामध्ये भाजपाचं चिन्ह आणि नाव असलेले झेंड भाजपा कार्यकर्ते वाटत असल्याची तक्रार काही लोक प्रशासकीय अधिकाऱ्याकडे करताना दिसत आहेत.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा व्हिडीओ परभणीमधला असून स्थानिक भाजपा कार्यकर्ते भाजपाचं चिन्ह आणि नाव असलेले झेंडे वाटत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमध्ये भाजपा लिहिलेली बाजू घडी करून एक झेंडा काँग्रेसचे परभणीतील आमदार सुरेश वरपुडकर हे प्रशासकीय अधिकाऱ्याला दाखवत आहेत. या प्रकाराची तक्रार देखील केली जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर त्यासाठी भाजपानं देशाची माफी मागितली पाहिजे, असं सचिन सावंत ट्विटरद्वारे मागणी केली.

अतिशय संतापजनक…भाजपाचे कार्यकर्ते परभणीमध्ये भाजपाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असलेले राष्ट्रध्वज लोकांना वाटत होते. हा देशद्रोह नाही तर काय आहे? काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी पोलीस अधिक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली. भाजपानं याची जबाबदारी घेऊन देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी ट्विटरद्वारे केली.

Check Also

मास्को कॉन्सर्ट हॉल वर दहशतवाद्यांचा हल्ला १०० हून अधिक ठार

नुकतेच रशियात झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या समोर कोणताही विरोधक उभा राहिला नसल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *