Breaking News

जालन्यात वऱ्हाडी म्हणून आले अन् ३९० कोटींची मालमत्ता जप्त करून गेले आयकर विभागाने महाराष्ट्रात केलेली सर्वात मोठी कारवाई

मागील महिन्यांपासून राज्यातील राजकिय नेत्यांच्या मागे ईडी, आयकर विभागाचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकांकडे फारशी अवैध मालमत्ता असते याची माहितीच पुढे येत नव्हती. मात्र आज आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी जालन्यात वऱ्हाडी असण्याचे सोंग घेत जालन्यातील स्टील कारखानदार, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि कपडे व्यापाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापा टाकला. या छाप्यात आयकर विभागाला तब्बल ३९० कोटींची रोख रकमेसह मालमत्ता आढळून आली. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींची मोजदाद करण्यासाठी १५ तासाहून अधिक कालावधी लागल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील प्राप्तीकर विभागाकडून मोठी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे आयकर विभागाचे अधिकारी लग्नाचे वऱ्हाडी म्हणून जालन्यात ट्रकमधून दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी ही कारवाई सुरू केली.

स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडले. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. १ ते ८ ऑगस्ट दरम्यान ही कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे, अधिकारी जवळपास १३ तास रोख रक्कम मोजत होते.

जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती.

छापे टाकले असता एकूण ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं उघड झाले. यामध्ये ५८ कोटींच्या रोख रकमेसह, सोन्याचे दागिने, हिरे तसंच ३०० कोटींच्या स्थायी मालमत्तेचा समावेश आहे. प्राप्तीकर विभागाने सर्व मालमत्ता जप्त केली असून, कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे. दरम्यान यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

रोख रक्कम जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास मोजणी सुरु होती. स्टेट बँकेत सकाळी ११ वाजता सुरु केली मोजणी रात्री १ वाजेपर्यंत सुरु होती. राज्यभरातील आयकर विभागाचे २६० अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *