Breaking News

कट्टर हिंदूत्ववादी शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरम सणाच्या दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी २०-२५ जणांचा होणार शपथविधी

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या पाठिंब्याने सरकार सत्तेवर आले. हे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील आणि भाजपाकडून हे सरकार हिंदूत्ववादी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या हिंदूत्वावादी सरकारकडून एक महिन्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिंदू सणाच्या किंवा हिंदू शुभ दिवशी होणे अपेक्षित असताना मात्र मुस्लिम समाजाच्या दृष्टीने दुःखाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशीच मंत्रिमंडळाचा विस्तार होत त्यांचा शपथविधी करण्यात येत असल्याने शिंदे-फडणवीस सरकारचे हिंदूत्व हे तोंडदेखले की खरे हिंदूत्व यावरून चर्चेला सुरुवात झाली आहे.

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांकडून आम्ही हिंदूत्वासाठी शिवसेनेत उठाव केल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरेंचे विचार वाचविण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी या गोष्टी केल्याचे जाहिर सांगितले. तसेच या उठावामुळे शिवसेना वाचणार असल्याचेही जाहिर केले. त्याचबरोबर आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर बसल्याने आम्हाला सावरकर यांचा अपमान होत असताना गप्प बसावे लागले, तसेच दाऊद इब्राहीम यांच्याशी संबध असणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात आम्हाला बोलता आले नसल्याचे वक्तव्यही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले होते.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून हिंदूत्वावादी पध्दतीने राज्याचा कारभार हाकला जाणार असल्याचे बोलले जात होते. इतकेच नव्हे तर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी तर हे सरकार महाविकास आघाडीचे सरकार नाही तर हिंदूत्ववादी विचारसरणीचे सरकार असल्याचे जाहिरपणे सांगितले.

या साऱ्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव किंवा दहिहंडीच्या दिवशी किंवा इतर हिंदू सणाच्या शुभ दिवशी राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होवून शपथविधी होईल अशी अटकळ होईल अशी अपेक्षा होत होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने हिंदू सणाच्या दिवस निवडण्याऐवजी मुस्लिम समाजाच्या मोहरम या सणाच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि विस्तारातील मंत्र्यांचा शपथविधी घेण्याचे निश्चित केले आहे.

उद्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात २०-२५ जणांचा होणार शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूत्ववादी सरकारचे हे धर्मनिरपेक्ष हिंदूत्व का खरे हिंदूत्व असा सवालही हिंदूत्वावाद्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मग या दिवसासाठीच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडविला होता का? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

बिल्कीस बानो: या मुद्यांच्या आधारे न्यायालयाने ठरविला गुजरात सरकारचा निर्णय अवैध

देशातील गोध्रा येथील जातीय दंगली दरम्यान बिल्कीस बानो या मुस्लिम गरोदर महिलेवर बलात्कार करून तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *