Breaking News

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपासोबत गेले अन् पावन झालेल्यांची संख्या चार संजय राठोड, राधाकृष्ण विखे-पाटील, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाले. मात्र न्यायालयीन लढाईमुळे शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार ३९ दिवस रखलेला होता. हा रखडलेला मंत्रिंडळाचा विस्तार आज अखेर झाला. मात्र या विस्तारात भाजपासोबत गेले अन् पावन झालेल्या मंत्र्यांची लक्षात येण्यासारखी आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांचे एका त्यांच्यापेक्षा वयाने निम्म्या वयाच्या मुलीबरोबर प्रेमसंबध असल्याने त्या मुलीने केलेल्या आत्महत्येस राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला. तसेच राठोड यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर भाजपाने मोहिमही राबविली. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काही तास आधी राजीनाम्याची मागणीही दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात संजय राठोड सहभागी झाले. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थानही मिळविले. तरीही भाजपाच्या पदाधिकारी चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याबरोबरील आपला लढा सुरुच राहणार असल्याचे जाहिर केले. चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही. त्यामुळे भाजपासोबत गेले अन् पावन झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

याचबरोबर काँग्रेसचे विधानसभेत विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात त्यांचे सख्खे भाऊ अशोक विखे-पाटील यांनी राधाकृष्ण विखेंवर आरोप करत त्याची कागदपत्रेही जाहिर केली. तसेच या भ्रष्टाचाराची कागदपत्रे अमित शाह यांच्याकडेही पाठविली. परंतु राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कारवाईच्या भीतीने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस अथवा अन्य नेत्यांनी त्यानंतर एक चकार शब्दही काढला नाही. याशिवाय डॉ.विजयकुमार गावित हे आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप मोठ्या प्रमाणावर झाले. तसेच त्यांना तुरुंगात घालण्याची घोषणाही भाजपाकडून करण्यात आली. मात्र २०१४ सालच्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर डॉ.विजयकुमार गावित यांनी थेट भाजपामध्येच प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्याबाबतही भाजपासोबत गेले अन् पावन झाले अशी चर्चा सुरु झाली.

माजी अर्थमंत्री व वनमंत्री सुधीर मुगंटीवार दावा केलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीवरून वारेमाप आरोप झाले. मात्र त्यांच्या विरोधातही कोणतीही कारवाई झाली नाही. तर माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाच्या कार्यकाळात पक्षात येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला काढून घेतलेला भूखंड परत देवून टाकला. त्यामुळे भाजपामध्ये असलेले आणि

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *